(फोटो सौजन्य: Pinterest)
Madhya Pradesh : लग्नाच्या एक दिवसाआधी तरुणीने संपवले आयुष्य, कारण अजूनही गुलदस्त्यात…
पोलिस ठाण्यात केलं बंद
सदर घटना ही हरियाणाच्या कुरुक्षेत्र जिल्ह्यात घडल्याचे स्पष्ट होत आहे. लाडवा उपविभागातील एका खासगी बँकेत काम करणाऱ्या आणि कर्करोगाने ग्रस्त असलेल्या एका तरुणाचा नाकाबंदी दरम्यान पोलिसांसोबत वाद निर्माण झाला. यानंतर पोलिसांनी त्याला पोलिस ठाण्यात नेले. पिडिताने सांगितले की, त्याच्या डाव्या पायात बोन कॅन्सर असून तो यावर उपचार घेत आहे. अलिकडेच त्याची किमोथेरेपी झाली ज्यामुळे त्याच्या डोक्यावरील आणि शरीरावरील केस गळू लागली होती. १७ जून रोजी तो रात्री बँकेतील आपले काम पूर्ण करुन घरी परतत असताना रस्त्यात नाकेबंदी दरम्यान पोलिसांनी त्याला अडवले. तरुणाचा आरोप आहे की, तोंडावर कापड बांधल्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं.
तरुणाने पुढे सांगितले की, चेहऱ्यावर कापड पाहताच दोन होमगार्डने ते कापड हटवू पाहिले ज्याचा विरोध केल्यावर डायल-११२ वर तैनात असलेले दोन पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहचले. यानंतर तरुणाला जबरदस्तीने गाडीत बसवून पोलिस ठाण्यात नेण्यात आलं. तरुणाच्या सांगण्यानुसार, सुरुवातीला त्याला अर्धा तास बंद करण्यात आलं आणि नंतर रात्रीच्या वेळी त्याला पोलिस ठाण्याच्या एका खोलीत नेण्यात आलं. इथे पोलिसांनी त्याला मारहाण केली. दोन सहायक उपनिरीक्षक (एएसआय) आणि एका होमगार्डने त्याचे कपडे काढून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचाही आरोप तरुणाने लावला.
Solapur Crime: माढ्यात जुन्या वादातून सख्ख्या भावावर कोयत्याने हल्ला; डोक्यात 8 वार
अधिकाऱ्यांवर कारवाई
घटनेनंतर तरुणाची प्रकृती खराब झाली ज्यामुळे त्याला एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले. माहिती मिळताच अधिकारी रुग्णालयात दाखल झाले आणि त्यांनी रुग्णाची तक्रार रितसर नोंदवून घेतली. या प्रकरणात तरुणाने न्यायाची मागणी करत पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी पिडिताचा जबाब नोंदवला असून आरोपांच्या सत्यतेची चाैकशी केली जात आहे. सध्या या प्रकरणात दोन असिस्टेंट सब-इंस्पेक्टर (ASI) आणि एका होमगार्डवर कारवाई करत त्यांना निलंबित करण्यात आलं आहे.






