Sanjay Raut Gungi Gudiya Remark Sunetra Pawar,
Sanjay Raut on Gungi Gudiya remark: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा गुंगी गुडिया असा उल्लेख करत काँग्रेसने त्यांच्यावर टिका केली होती. या टिकेमुळे राजकारण तापलं असतानाच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीदेखील या टिकेचे समर्थन करत नव्या वादाची ठिणगी टाकली आहे. ‘गुंगी गुडिया’ हा काही असंसदीय शब्द नाही आणि राजकारणात आलेल्या सुनेत्रा पवारांनी टीका सहन करायलाच हवी, असे रोखठोक वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.
गेल्या वर्षभरात बीडमधील वाढत्या गुन्हेगारच्या प्रश्नांवर सुनेत्रा पवारांनी बाळगलेल्या मौनामुळे काँग्रेसने ते ट्वीट केले होते, असेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच, त्यांच्याजागी फडणवीस आणि शिंदे असते तर त्यांनाही गुंगा-गुड्डा म्हटलं असतं’ असा टोलाही संजय राऊतांनी लगावला आहे.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, सुनेत्रा पवार राजकारणा नवख्या असल्या तरी त्यांच्या कुटुंबाला मोठा राजकीय वारसा लाभला आहे. त्या हळुहळु राजकाणात स्थिरावतील. पण बीडच्या मुद्द्यावर बोलताना अचानक धनंजय मुंडेंनी आपले भाषण सुरू केले. त्यावेळी सुनेत्रा पवार यांनी त्यांची भूमिका मांडणे अपेक्षित होते. त्यांच्या जागी देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे असते तर, त्यांनाही गुंगा गुड्डा म्हटले गेले असते. काही वर्षांपूर्वी इंदिरा गांधींवरही अशीच टिका झाली होती. पण त्यांनी आपल्या कर्तृत्त्वाने सर्वांना उत्तर दिले. सुनेत्रा पवार यादेखील घटनात्मक पदावर असल्याने त्यांना प्रश्न विचारण्यात आला होते. पण यापुढे त्या नक्की बोलतील अशी अपेक्षा आहे.
आता काँग्रेस कार्यालयांवर हल्ले करण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांनी जतनेची कामे करावीत. सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेदेखील अनेक मुद्द्यांवर मौन आहेत. म्हणजेच तेदेखील गुंगा गुड्डा आहेत. असा टोलाही संजय राऊत यांनी यावेळी लगावला.
विद्यार्थी आंदोलने, राम मंदिराच्या देणग्यांची चोरी आणि परीक्षांमधील अनियमितता यावरून विरोधी पक्ष सध्या लोकसभेत गदारोळ करत आहे. पण अमित शाह सभागृहात उपस्थित राहत नाहीत. या संदर्भात संजय राऊत म्हणाले, “हे लोक इंदिरा गांधींना गुंगी गुडिया म्हणायचे. वास्तविक पाहता, आमचे गृहमंत्री एक गुंगी गुडिया आहेत. ते सभागृहात येत नाहीत, ते बोलत नाहीत. ज्यांनी एवढी मोठी वक्तव्ये केली, ते अचानक शांत कसे झाले? संपूर्ण विरोधी पक्ष एकजूट आहे आणि तसाच राहील, आणि देशाच्या गृहमंत्र्यांना सभागृहात यावेच लागेल.”
राम मंदिरातील नैवेद्य चोरी प्रकरणात संतांवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत म्हणाले, “या घोटाळ्यात संत सामील आहेत असे आम्ही कधी म्हटले? आम्ही म्हटले की भाजप नेत्यांनी हा घोटाळा केला आहे. आम्ही भाजप नेत्यांना कधीही संत म्हटले नाही. त्यांची तुलना संतांशी कधीच होऊ शकत नाही. संतांची तपश्चर्या वेगळी असते, त्यांचे राहणीमान पूर्णपणे वेगळे असते. चंपत राय यांना संत म्हणता येईल का? अनिल मिश्रा संत आहेत का? गोपाल राव संत आहेत का? नाही. हे भाजपचे नेते आहेत. आम्ही संतांचा कधीही अपमान केलेला नाही आणि कधी करणारही नाही.”






