CJP Next Strategy Abhijeet Dipke : "राजकीय पक्ष काढणार नाही!"; सीजेपीच्या बैठकीनंतर अभिजित दीपके यांची मोठी घोषणा
CJP Next Strategy Abhijeet Dipke: जंतरमंतरवरील कॉकरोच जनता पार्टीचं मोठं आंदोलन आणि २० जुलैच्या मोठ्या लाठीचार्जनंतर अखेर धर्मेद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिला. या आंदोलनात २० जुलैला विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जनंतर देशभरातच नव्हे तर परदेशी माध्यमांनीही या आंदोलनाची दखल घेतली. २५ जुलैला सीजेपीचे आंदोलन थांबवण्यात आले असले तरी सीजेपीच्या अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत देशातील लाखो विद्यार्थ्यांसह तरूणदेखील आता या पार्टीशी जोडले गेले आहेत. जंतरमंतरवरील आंदोलनानंतर आता सीजेपीची भविष्यातील वाटचाल काय, पुढची रणनीती काय, असे शेकडो सवाल आता सीजेपीच्या नेत्यांना विचारले जात आहेत.
देशभरातून उपस्थित होणाऱ्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्या संभाजीनगर येथील निवासस्थानी सीजेपी च्या कोअर कमिटीची दोन दिवसीय बैठक सुरु आहे. बुधवारी (5 ऑगस्ट) या बैठकीला सुरुवात झाली. यानंतर आज सीजेपीकडून भविष्यातील वाटचाल आणि देशभरात सीजेपीचे जाळे विस्ताराबाबत आज सीजेपी कडून मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्याच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणारी सीजेपी आता देशभरात आपले जाळे विस्तारण्याचा निर्णय घेऊ शकते. यासोबतच शिक्षण व्यवस्थेत मोठ्या सुधारणा करण्याची रणनीतीही सीजेपी रणनीती काय असेल, याकडेही देशाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, CJPचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी या बैठकीबाबत माहिती दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर येथे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक सुरु आहे. कॉकरोच जनता पार्टी (CJP)लवकरच आगामी वाटचालीचा रोडमॅप आज जाहीर करणार आहे. या बैठकीत संघटनेच्या पुढील ध्येय धोरणावर सखोल चर्चा आणि विचारमंथन करण्यात आले. देशभरातून विद्यार्थी, पालक आणि समर्थकांकडून प्राप्त झालेल्या सूचना व मागण्यांचा अभ्यास करून पुढील कृती आराखडा तयार करण्याचे काम सुरु आहे.
आशुतोष रांका यांनी इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले की, संघटनेच्या नेतृत्वाने शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर देशव्यापी पातळीवर प्रभावी भूमिका घेण्यासाठी व्यापक आराखडा तयार केला आहे. विद्यार्थ्यांच्या हिताच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवण्यासोबतच संघटनात्मक विस्तारालाही प्राधान्य दिले जाणार आहे.
पाच जुलैला तब्बस सात तास चाललेल्या बैठकीत CJPच्या राष्ट्रीय विस्ताराचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. प्रत्येक राज्यात विद्यार्थी संघटनांचे मजबूत नेटवर्क उभारणे, स्थानिक शिक्षणविषयक आंदोलनांना पाठिंबा देणे आणि शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांवर राष्ट्रीय स्तरावर दबाव निर्माण करणे, यावर बैठकीत एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे. संघटनेच्या मते, विविध राज्यांतील विद्यार्थ्यांना एकत्र आणून शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा आणि उत्तरदायित्वासाठी व्यापक सामाजिक चळवळ उभारण्यावर भर दिला जाणार आहे.
बैठकीनंतर संस्थापक अभिजीत दिपके यांनी CJP निवडणुका लढवण्याचा किंवा पारंपरिक राजकारणात उतरण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले. देशातील जनतेचा व्यवस्था, न्यायव्यवस्था आणि पारंपरिक राजकारणावरील विश्वास कमी होत असल्याचा दावा करत त्यांनी संघटना सत्तेच्या राजकारणाऐवजी शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांवर प्रभावी दबावगट म्हणून काम करेल, असे सांगितले.
पेपरफुटीविरोधी आंदोलनानंतर देशभरात निर्माण झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर CJP आज आपल्या पुढील रोडमॅपची अधिकृत घोषणा करणार आहे. या घोषणेत संघटनेचा राष्ट्रीय विस्तार, विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठीच्या पुढील आंदोलनाची दिशा, संघटनात्मक बांधणी आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांसाठीच्या आगामी उपक्रमांची माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे CJPच्या आजच्या घोषणेकडे विद्यार्थी, पालक आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






