काय घडलं नेमकं?
देवांशी मंगेश स्वामी आणि साईचरण दिनेश स्वामी असे बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलांची नावे आहेत. हे दोघे सकाळी ७च्या सुमारास बेपत्ता झाले होते. कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला मात्र ते कुठेच सापडले नाही. कुटुंबीयांनी तातडीने चाकूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गावात आणि परिसरात पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली. त्यादरम्यान काही तासांनी सहा वर्षीय देवांशचा मृतदेह सापडून आला. त्याचा मृतदेह घरापासून अवघ्या ६० फुटांच्या अंतरावर आढळून आला. ही माहिती मिळताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अद्याप साईचरण बेपत्ता
अद्याप ११ वर्षीय साईचरण हा बेपत्ता आहे. याचा देखील शोध पोलीस करत आहे. ही मुले नेमकी कश्यामुळे बेपत्ता झाली, देवंशाची हत्या का करण्यात आली, साईचरण कुठे आहे? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधात आहे. पोलीस तपासनंतरच या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. मृतदेह चाकूर येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर हत्या कशी करण्यात आली हे स्पष्ट होईल. घटनेची माहिती पसरताच नातेवाईक आणि गावकऱ्यांनी रुग्णालयासमोर मोठी गर्दी केली होती.
पोलिसांनी काय दिली माहिती?
याबाबत माहिती देताना पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सांगितले की, “घटनेचे गांभीर्य लक्षात घेताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेसह लातूर आणि अहमदपूर येथील पोलिसांची पथके चाकूर येथे दाखल झाली आहेत. जवळपास दहा पथके तयार करण्यात आली असून आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर बेपत्ता असलेल्या मुलाबाबत माहिती गोळा करून त्याचा शोध घेण्यावर विशेष भर दिला जात आहे.”
पुण्यात चाललंय काय? आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यावसाय; पोलिसांनी केली मोठी कारवाई
Ans: लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात.
Ans: दोन मुलं बेपत्ता झाली होती, त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला.
Ans: 10 पथके तयार करून तपास आणि बेपत्ता मुलाचा शोध सुरू केला आहे.






