Latur Crime: हृदयद्रावक घटना! दोन चुलत भाऊ बेपत्ता; एक मृत, दुसऱ्याचा थांगपत्ता नाही
काय नेमकं प्रकरण?
16 नोव्हेंबर ते 15 एप्रिल 2026 या कालावधीत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा धक्कादायक प्रकार घडला. आरोपीचे नाव ओळख शैलेश कुमार (वय 25) असे आहे. तो संबंधित गृहनिर्माण संस्थेत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता आणि तो इमारतीच्या तळमळल्याच्या एका खोलीत राहत होता. त्याने पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली, तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
मुलगी पाच महिन्यांची गर्भवती
काही दिवसांपूर्वी, जेव्हा पीडित मुलगी आजारी पडली तेव्हा तिच्या आईने तिला ससून रुग्णालयात दाखल केले. तिथे वैधकीय तपासणी केली असता, डॉक्टरांनी ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. रुग्णालयात प्रशासनाने घटनेची माहिती पोलिसांना दिली होती.
या संबंधित प्रकरणात पीडितेच्या आईने आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली असून पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलीस कारवाई करणार असल्याचा आरोपीला संशय येताच त्याने घटनास्थळावरून पळ काढला. तो सध्या फरार असून पोलीस तपास करत आहे.
पुण्यात चाललंय काय? आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यावसाय; पोलिसांनी केली मोठी कारवाई
भारती विद्यापीठ येथील दत्तनगरमधील चंद्रभागा चौकात ‘योग आयुर्वेदिक पोटली मसाज’ सेंअरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यावसायावर गुन्हे शाखेच्या पथकाने छापेमारी केली आहे. छापा कारवाईत पोलिसांनी येथून पाच मुलींची सुटका केली आहे. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंधक कक्षाने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता १४३(१)(३), ३(५) अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.






