सिंधुदुर्गात भीषण अपघात! भरधाव बस आणि रिक्षाचा चक्काचूर; चौघांचा जागीच मृत्यू
नागपूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. आईसोबत ऑटोतून खाली उतरत असतांना एका सात वर्षीय मुलाला ट्रकने चिरडल्याची घटना घडली आहे. ही घटना हिंगणा टी पॉईंटवर घडली असून आई आणि बहिणीच्या डोळ्यादेखत या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला आहे.
लोकलट्रेन, टॅक्सी, रिक्षा, बसमध्ये छेडछाड सुरूच; मुंबईत महिला असुरक्षित
नागपूरच्या हिंगणा टी पॉईंटवर एक भीषण अपघात झाला आहे. एका सात वर्षीय मुलाला ट्रॅकने चिरडल्याची घटना घडली आहे. आहान नायक असे या सात वर्षीय मुलाचे नाव आहे. शिकवणी वर्ग आटोपवून आई व बहिणीसोबत घरी परतत असतांना त्याच्यावर काळाने घात केला. आई आणि बहिणीच्या डोळ्यादेखत आहानचा दुर्दैवी मृत्यू झाला.
समोर आलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर जखमी अस्वस्थेत असलेल्या आहानला स्थानिकांनी रुग्णालयात भरती केले. मात्र उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. एमआयडीसी पोलिसांनी ट्र्क चालकाला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
भंडाऱ्यात वाहन उलटून अपघात, एका महिलेचा मृत्यू तर सात जण जखमी
नातेवाईकाच्या लग्नाला जाणाऱ्या वाहनाचे नियंत्रण सुटले आणि जवळच्या शेतात उलटले. या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने तिला भंडारा येथे उपचारासाठी हलविण्यात आले. ही घटना काल शुक्रवारी संध्याकाळी भंडारा येथील तुमसर तालुक्यातील साखळी – मिटेवाणी रस्त्यावर घडली. मृत महिलेचे नाव संगीता सलामे (३८) असे आहे आणि ती तुमसरच्या माजी नगरसेवक आणि आदिवासी नेते लक्ष्मीकांत सलामे यांच्या पत्नी आहे. सलामे कुटुंब नातेवाईकाच्या लग्नाला जात असताना समोरून येणाऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. चालक गंभीर जखमी झाला आहे आणि त्याला पुढील उपचारांसाठी भंडारा भंडाऱ्यात हलविण्यात आले आहे, तर उर्वरित जखमींवर तुमसर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.