सख्खा भाऊ ठरला पक्का वैरी ! सख्ख्या भावानेच चाकूने भोसकून केला भावाचा खून (फोटो सौजन्य: social media )
छत्तीसगडच्या बलरामपूर- रामानुजगंज जिल्ह्यातील कुसमी पोलीस स्टेशन अंतर्गत चैनपूर पंचायतीच्या पहाडी कोरवा वस्तीमध्ये एका पतीने आपल्या पत्नीची हत्या केली. तिने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला होता म्हणून हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पाटील अटक केली आहे. आरोपीचा नाव बबुआ कोरवा (वय 25) अशी आहे. ही घटना बुधवारी रात्रीची आहे.
समाजमाध्यमांवर पाकिस्तान झिंदाबादचा मजकूर; पुणे पोलीसांनी तरुणीला घेतले ताब्यात
समोर आलेल्या माहितीनुसार, चैनपूर पंचायतीतील सरंगा जोभी पाठ येथील लालखवा कोरवा पारा येथील रहिवासी बबुआ कोरवा याचे चार वर्षांपूर्वी गावातीलच मधू कोरवा याची मुलगी ढेली बाई यांच्याशी लग्न झाले होते. त्यांना दोन मुले आहेत. बुधवारी रात्री बबुआचे आई-वडील आणि कुटुंबातील इतर सदस्य नातेवाइकांकडे गेले होते. बबुआ दारू पिऊन रात्री घरी आला. त्याने पत्नीशी शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु काही कारणास्तव पत्नीने नकार दिला.
बबुआला राग अनावर झाला आणि त्याने पत्नीला मारहाण करण्यास सुरवात केली. जेव्हा बबुआच्या सासऱ्या मधु यांना कळले की त्यांच्या जावई त्यांच्या मुलीला मारहाण करत आहे. तेव्हा मधू आपल्या धाकट्या भावासह साधो यांच्यासह मुलीच्या सासरी पोहोचले. तेव्हा बबुआ आपल्या सासरे आणि त्यांच्या धाकट्या भावाशीच भांडला. यावर मधू आणि साधो यांनी जावयाला मारहाण केली आणि त्याला भांडण न करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्या रात्री दोघेही आपल्या घरी परतले.
बबुआचे सासरे आणि त्यांचा धाकटा भाऊ घरी आले म्ह्णून तो आपल्या पत्नीवर आणखी संतापला. त्याने पत्नीला सांगितले की तू मला मार खायला लावला. इतकेच नाही तर त्याने पुन्हा पत्नीला मारहाण केली आणि तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याने पत्नीला बेदम मारहाण केली आणि दगड उचलून तिच्या डोक्यावर टाकला, ज्यामुळे पत्नीचा जागीच मृत्यू झाला.
पत्नीची हत्या केल्यानंतर बबुआने तिचा मृतदेह गुंडाळला आणि रात्रभर मृतदेहाजवळ बसून राहिला. या घटनेची माहिती गुरुवारी सकाळी शेजाऱ्यांना समजली. त्यांनी गावाच्या कोटवाराला याबाबत माहिती दिली. कोटवाराने पोलिसांना ही माहिती सांगितली. माहिती मिळताच कुसमी पोलीस स्टेशनचे प्रभारी ललित यादव यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी बबुआ कोरवा याला अटक केली. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे.
बीड जिल्ह्यात भीषण अपघात, कारची लक्झरी बसला धडक; दोघांचा जागीच मृत्यू