uttar pradesh (फोटो सौजन्य- social media)
पती पत्नीमध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद विवाद होत असतात, रुसवा- फुगवा होत असतो. आणि या गोष्टीने पती- पत्नीच्या नात्याला गोडवा येतो आणि प्रेम देखील वाढतो. परंतु उत्तरप्रदेशातील एका गावात पती- पत्नीच्या किरकोळ वादाला अचानक हिंसक वळण लागले. यानंतर पती गाढ झोपेत असतांना पत्नीने रागाच्या भारत उकळते तेल पतीच्या अंगावर फेकल्याची घटना घडली आहे. यामुळे पती गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
बुलडाण्यात भीषण अपघात; भरधाव टिप्परने दोन बालकांना चिरडले, दुचाकीवरील आजी-आजोबाही गंभीर
नेमकं काय घडलं?
जखमीचं नाव सज्जन पासी (वय वर्ष- ३०) आहे तर त्यांच्या पत्नीचं नाव रामावती सज्जन पासी असं आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यात घडली आहे. त्यांच्यात नेहमीच काही ना काही कारणाने वाद व्ह्याचे. ७ मे रोजी संध्याकाळी सज्जन आणि रामावतीमध्ये बाचाबाची झाली. पण काही वेळानंतर त्यांच्यातील भांडण मिटली. त्यांना असं वाटलं की सर्व काही ठीक होईल असं सज्जन यांना वाटले आणि ते शांतपणे झोपण्यासाठी निघून गेले. रात्री जेवण झाल्यानंतर ते बेडरूम मध्ये गाढ झोपेत असतांना अचानक त्यांची पत्नी रामावती तिथे आली. तिच्या मनात अजूनही भांडणाचा राग होता.
रामवती रागात बेडरुममध्ये आली. तिने रागाच्या भरात सज्जनच्या अंगावर उकळते तेल ओतले. अचानक अंगावर तेल पडल्याने सज्जन वेदनेने किंचाळले आणि या किंकाळ्या ऐकून घरातील लोक आणि शेजारी धावत आले. त्यांनी तातडीने सज्जनला जवळच्या शिवगड येथील आरोग्य केंद्रात दाखल केले. पण त्यांची गंभीर अवस्था पाहून डॉक्टरांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यास सांगितले. आता सज्जन जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
डॉक्टरांनी काय दिली माहिती?
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सज्जन हे या हल्ल्यात गंभीररीत्या भाजले आहे. विशेषतः त्यांचा चेहरा आणि मान मोठ्या प्रमाणात भाजली आहे.
सज्जनने काय दिली प्रतिक्रिया?
या संपूर्ण घटनेनंतर सज्जन यांनी प्रतिक्रिया दिली, ‘मला असं वाटलं होते की सर्व काही ठीक झाले आहे, पण मला काय माहित होते की तिचा राग अजूनही शांत झालेला नाही, अशी प्रतिक्रिया सज्जन यांनी दिली.
या धक्कादायक घटनेनंतर सज्जन यांची पत्नी रामावती घरातून फरार झाली आहे. पोलिसांनी सज्जन पासी यांच्या तक्रारीवरून रामावती विरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस सज्जनची पत्नी रामवतीचा शोध घेत आहे. याप्रकरणी लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलीस स्टेशनचे अध्यक्ष विंध्य विनय यांनी दिली. या घटनेमुळे सुरजपूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Akluj Crime : राज्यात चोरट्यांचा धुमाकूळ! घराचे कुलूप तोडून तब्बल ‘इतक्या’ लाखांचे दागिने लंपास