आयआयटी बाबाला अटक (फोटो- सोशल मिडिया)
उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये नुकताच महाकुंभ पार पडला आहे. यामध्ये आयआयटी बाबा खूप चर्चेत राहिलेले नाव आहे. मात्र आता आयआयटी बाबा उर्फ अभय सिंहला जयपूर पोलिसांनी अटक केली आहे. सोशल मिडियावर जीव देण्याची धमकी दिल्याबद्दल जयपूर पोलिसांनी आयआयटी बाबा उर्फ अभय सिंहला अटक केली आहे. जयपूर पोलिसांनी रिद्धी-सिद्धी परिसरातील एका हॉटेलमध्ये त्याला ताब्यात घेण्यात आले. यावलेस त्याच्याजवळ काही ड्रग्स देखील सापडल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी आयआयटी बाबाला अटक केली आहे. दरम्यान त्याच्याजवळ गांजा (ड्रग्स) देखील सापडले असल्याचे समोर येत आहे. त्याच्यावर एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. काही भगवे कपडे घातलेले लोक न्यूजरूममध्ये आले आणि त्यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप आयआयटीबाबाने केला होता. ते प्रकरण ताजे असतानाच आता जयपूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
अटक झाल्यावर आयआयटी बाबा काय म्हणाले?
माझ्याजवळ थोडासा प्रसाद (गांजा) सापडला आहे. कोणीतरी सांगितले होते की बाबा जीव देणार आहेत. पोलिस एका विचित्र प्रकरणाचे निमित्त घेऊन आले होते. मी त्यांना सांगितले की जर तुम्ही या प्रसादावर गुन्हा दाखल केला तर कुंभमेळ्यात इतके लोक तो पितात, तर त्या सर्वांना अटक करा.
प्रयागराज महाकुंभात IIT बाबाचा मोठा दावा
महाकुंभ सुरू झाल्यापासून, दररोज लाखो लोक प्रयागराजला पोहोचत आहेत. अलीकडे आयआयटीयन बाबा खूप चर्चेत आहे. त्यांनी IIT मुंबई येथून एरोस्पेस अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. आता त्याचा आणखी एक VIDEO व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो असा दावा करीत आहे की त्याच्यामुळेच भारताने २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकला. गेल्या वर्षी झालेल्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी हरवून ऐतिहासिक विजय मिळवला होता, याची आठवण करून देतो.
भारताला विश्वचषक जिंकून दिला
एका मीडिया मुलाखतीत IIT बाबांना विचारण्यात आले की, ते क्रिकेट पाहतात का? यावर उत्तर देताना तो म्हणाला, “हो, मी खूप क्रिकेट पाहिले आहे. मी भारताला २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकून दिला. मी वारंवार सांगत होतो की चेंडू हार्दिक पंड्याला द्या, पण रोहित शर्मा तसे करत नव्हता, अखेर त्याने ऐकले आणि भारत विश्वचषक जिंकला.”
भारत दुसऱ्यांदा विश्वविजेता बनला
२००७ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला. त्यानंतर टीम इंडियाला १७ वर्षे वाट पहावी लागली. अखेर, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला. हा विजय भारतीय संघासाठी खूप संस्मरणीय ठरला कारण त्यांनी कोणताही सामना न गमावता विजेतेपद जिंकले.