काय घडलं नेमकं?
आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव निकिता अमरदीप भूरे (वय 25) असे आहे. तिच्यासोबत तिची दोन लहान मुले शिवानी आणि शिवांश यांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पती-पत्नीचा घरगुती वाद टोकाला गेला आणि ही हृदयद्रावक घटना घडली. संध्याकाळपासून मध्यरात्रीपर्यंत पती- पत्नीमध्ये वाद सुरु होते. त्यांनतर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास निकिता भुरे या आपल्या दोन्ही मुलांना घेऊन घराबाहेर पडल्या. त्यांनतर सकाळी त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र तिघेही कुठेच सापडले नाहीत. अखेर दुपारनंतर घराशेजारील विहिरीत तिघांचे मृतदेह आढळून आले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
या घटनेची माहिती मिळताच किल्लारी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले आहेत. पोलीस पुढील तपास करत आहे. या घटनेने नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
लातूर हादरलं! 6 वर्षीय पुतण्याचा खून चुलतीनेच केला; 17 तासांत गुन्ह्याचा पर्दाफाश
लातूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चुलतीनेच सहा वर्षीय पुतण्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. १७ तासांच्या आत पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्वामी कुटुंबातील दोन अल्पवयीन चुलते बेपत्ता झाले होते. पोलीस तपासात सहा वर्षीय मुलाचा मृतदेह आदळून आला होता. पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी करत या गुन्ह्याचा १७ तासांच्या आत पर्दाफाश केला.
का केली हत्या?
चुलतीनेच हत्या केल्याचे सामोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. स्वामी कुटुंबात मागील काही वर्षांपासून मालमत्तेच्या वाटणीवरून वाद सुरु होता. हा वाद पंचाच्या उपस्थित मिटविण्याचे प्रयत्नी करण्यात आले होते. मात्र या वादातून निर्माण झालेल्या रागाच्या भरात अनिता दिनेश स्वामी (वय 34) हिने आपल्या पुतण्याचा खून केल्याचा समोर आले आहे.
Beed Crime: लग्नाचे आमिष, दोन वर्षे अत्याचार, धर्मांतराची अट घालून धमक्या; गुन्हा दाखल
Ans: लातूर जिल्ह्यातील खरोसा येथे.
Ans: कौटुंबिक वादातून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या.
Ans: घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले.






