काय घडलं नेमकं?
आरोपी सलमान अजीज पठाण यांनी तिला लग्नाचे स्वप्न दाखवून दोन वर्षांपूर्वी आपल्या जाळ्यात ओढले आणि तिच्याशी संबंध प्रस्थापित केले. पीडित महिलेने लग्नाचा विषय काढला त्यावेळी आरोपीने मुस्लिम धर्म स्वीकारल्याशिवाय लग्न करणार नाही अशी अट घातली. एवढेच नाही तर ‘तुला काय करायचे आहे ते कर’ असे म्हणत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी ही दिली.
कोरेगाव पार्क परिसरात तरुणावर हल्ला; गळ्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केला अन्…
या धमकीला कंटाळून पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सलमान अजीज पठाण याच्याविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात बीएनएस कलम 69, 352 आणि 351(2) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी सलमान हा फरार असून त्याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. दरम्यान धर्मांतरासाठी दबाव आणण्याच्या या घटनेमुळे जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे.
बीड हादरलं! तक्रार मागे घेण्यासाठी तरुणावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; शिवसेना माजी जिल्हाप्रमुखासह 7 जणांवर गुन्हा
बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असताना आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकत एका तरुणावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह सात जणांविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली आहे.
काय घडलं नेमकं?
जुन्या वादातून पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली होती. या आधारे संबंधितांवर पोलीसांनी गुन्हा नोंद केला होता. ती तक्रार आणि गुन्हा मागे घ्यावा यासाठी संबंधित व्यक्ती तक्रारदारावर सातत्याने दबाव आणत होते. याच प्रकरणातून बीडच्या म्हाळसजवळा गावातील एका तरुणाला सात जणांनी काठ्या कुऱ्हाडीने जबर मारहाण केली. या प्रकरणात प्रभाकर खांदे असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्यावर सध्या बीडच्या जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
प्रभाकर खांडे याच्या भावाबरोबर कुंडलिक खांडे आणि त्याच्या साथीदारांचे यापूर्वी वाद झाले होते. त्यातून गुन्हा नोंदवण्यात आला होता. हा गुन्हा मागे घेण्यासाठी संबंधित तरुणावर सातत्याने दबाव आणला जात होता, असा दावा तक्रारदाराने केला आहे. आरोपींनी यापूर्वीही ज्ञानेश्वर खांडे यांच्यावर देखील हल्ला केला होता, अशी माहिती आहे.या प्रकरणात शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह सात जणांविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Ans: बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे.
Ans: लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार आणि नंतर धर्मांतरासाठी दबाव.
Ans: आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू आहे.






