आंध्र प्रदेशातील एनटीआर जिल्ह्याचा मूळ रहिवासी असलेल्या एका तरुणाने युट्युब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून व्हिडीओ बघून हत्या आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची पद्धत शिकली. आणि आपल्या मित्राचीच निर्घृण हत्या करून विलेवाट लावली. नेमकं काय घडलं?
नेमकं काय घडलं?
आरोपीचा नाव अशोक असे आहे. तो आंध्रप्रदेश येथील एनटीआर जिल्ह्याचा मूळ रहिवासी असून तो काही कळापासून खम्मम येथे राहत होता. त्यावेळी त्याची ओळख ४० वर्षाच्या वेंकटेश्वरलु नावाच्या तरुणाशी झाली. वेंकटेश्वरलु बंजारा गावाचा रहिवासी असून एका खाजगी कंपनीत तो कार्यरत होता. दोघांमधील संवाद वाढत गेला आणि कालांतराने त्या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. मात्र, यांच्यातील हे नातं समलैंगिक संबंधात बदललं. वेंकटेश्वरलु हा अशोक पेक्षा मोठा होता.
तो बऱ्याचदा अशोकला आर्थिक मदत करायचा. शेतीत नुकसान होऊनही तो त्याला पैसे देत राहिला. पण कालांतराने त्यांच्यात भांडण वाढत गेली. आणि दरम्यान १५ सप्टेंबरच्या रात्री, वेंकटेश्वरलु अशोकच्या घरी गेला. त्यावेळी बोलणं सुरु असतांना, काही कारणावरून त्यांच्यात जोरदार वाद झाला. त्यावेळी संतापलेल्या अशोकने वेंकटेश्वरलुवर बरेच वार केले आणि यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
यूट्यूबवरून शिकला ठिकाणी लावण्याची पद्धत
हा मृतदेह ठिकाणी लावायचा तरी कसा? हा अशोकसामोर मोठा प्रश्न होता. मग त्याने इंटरनेटवर यासंबंधी योग्य पद्धत शोधण्याचा विचार केला. त्याने यूट्यूब वर व्हिडिओ पाहिले आणि मृतदेहाचे तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी कसे टाकायचे ते तो शिकला. व्हिडीओ बघून आरोपी अशोकने वेंकटेश्वरलुच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ते प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये भरले. त्यानंतर त्याने शहरातील करुनागिरी परिसरातील काही झुडुपे आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यात त्या पिशव्या टाकल्या. तसेच, हत्येनंतर, त्याने खोली स्वच्छ केली, रक्ताचे डाग सुद्धा पुसून काढले आणि सर्वकाही सामान्य दाखवण्यासाठी प्रयत्न केला.
बेपत्ता असल्याची मिळाली माहिती
मात्र, पोलिसांनी वेंकटेश्वरलु बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आणि त्या आधारे तपास सुरू करण्यात आला. मोबाईल लोकेशन, कॉल रेकॉर्डिंग आणि टेक्निकल तपासाच्या आधारे पोलिसांनी पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. अखेर त्यांनी अशोकचा शोध घेतला आणि त्यावेळी संपूर्ण घटना उघडकीस आली. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोकने एकट्याने नव्हे तर दोन साथीदारांच्या मदतीने हत्येचे पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रकरणातील तिन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 2.7 तोळ्याची सोन्याची चेन, एक मोबाईल फोन आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती आहे.