सोलापूर: सोलापुरातून एक फसवणुकीची घटना समोर आली आहे. जमिनीतून गुप्तधनाच्या हंडा काढून देतो असे सांगत भोंदू बाबांकडून १ कोटी ८७ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाला सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केलं आहे. मोहम्मद कादर शेख असे फसवणूक करणाऱ्या करणाऱ्या भोंदू बाबाचे नाव आहे. सोलापुरात अनेकांची फसवणूक करणाऱ्या मोहम्मद कादर शेख याला कर्नाटकातील विजापूर येथून अटक करण्यात आली आहे.
भोंदू बाबाला सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे यांच्या टीमने अटक करण्याची कामगिरी केली आहे. मोहम्मद कादर शेख याने सोलापुरातील गोविंद वंजारी यांना जमिनीतून गुप्तधन काढून देतो असे सांगत फसवणूक केली आहे. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर सोलापूर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेने सापळा रचून भोंदू बाबाला त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे.
लहान मुलाच्या गळ्याला चाकू लावून टाकला दरोडा, मारहाण करत सोने आणि पैसे लुटले
सोलापूर शहरात झालेल्या दरोड्याने नारीकांमध्ये दहशत निर्माण केले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास शस्त्रधारी टोळीने घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करत नागरिकांना चाकूच्या धाकावर दरोडा टाकण्यात आल्याचे समोर आले आहे. ही घटना सोलापूर शहरातील अभिषेक नगरमधील अवंती हौसिंग सोसायटीमध्ये मध्यरात्रीच्या अडीचच्या सुमारास घडली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, चोरट्यांनी एका घरात घुसून लहान मुलाच्या गळ्याला चाकू लावला आणि घरमालक पुरुषाला मारहाण करत सोनं व रोख रक्कम जबरदस्तीने लुटली. यानंतर ते खालच्या मजल्यावरील दुसऱ्या घरात घुसले, तिथेही तशाच प्रकारे धमकी देऊन चोरी केली. या घटनेत चोरट्यांनी दोन घरे फोडण्यात यश मिळाले आहे. पोलिसांची वेळेवर हजेरी लागल्यामुळे इतर घरे लुटण्याचा प्रयत्न फसला. चोरटे अंधारात पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत, मात्र पोलीस त्यांच्या मागावर आहेत.
घटनेची माहिती मिळताच सोलापूर गुन्हे शाखेच्या उपायुक्त आश्विनी पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासोबत फॉरेन्सिक तज्ज्ञ व गुन्हे शाखेचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले असून, पुरावे गोळा करण्यात येत आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.