leopard attack (फोटो सौजन्य - social media)
पुण्यातील दौंड तालुक्यातील 11 महिन्याच्या मुलाला उचलून नेल्याची गंभीर घटना समोर आली आहे तिचे कुटुंबीय वाड्यावर असताना त्यांच्या अजूनही 11 महिने वयाच्या मुलाला उचलून नेले होते. त्याचा मृतदेह सापडला आहे. काल सकाळी ५:३० वाजता पासून या बालकाचा शोध सुरु होता.
यवतमाळ हादरलं; दुहेरी हत्याकांड, कौटुंबिक वादातून हत्या
मिळालेल्या माहितीनुसार बिबट्याने काल सकाळच्या वेळी त्या मुलाला ओढून नेले होते. बिबट्याने मुलाला ओढून घेऊन जात असताना त्या मुलाच्या आईने आरडाओरडा केला होता. मात्र तोपर्यंत बिबट्याने पलायन केले होते. या घटना मुळे स्थानिकांमध्ये भीतीच वातावरण आहे. वनविभाग काल पहाटे साडेपाच वाजता पासून शोध मोहीम करत होते.
वनविभाग आणि यवत पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने परिसरामध्ये बिबट्याच्या शोध घेण्यास सुरुवात केली होती मात्र 18 तास उलटल्यानंतर या चिमुकल्याचा थांगपत्ता लागलेला आहे वनविभाग आणि स्थानिक अश्या दोन्ही पोलिसांच्या पथकांकडून डॉग स्कॉडच्या माध्यमातून या चिमुकल्याचा शोध लागलेला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. त्याचा मृतदेह सापडला आहे. या घटनेमुळे भिसे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आणि स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एका तरुणीची गळा आवळून हत्या, आरोपी एका राजकीय पक्षाचा…..
कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका प्रियकराने आपल्याच प्रेयसीची गळा आवळून हत्या केली. दोघे लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये राहत होते. दोघांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरु होता. याच कारणाने आरोपीने तरुणीची गळा आवळून हत्या केली.
२२ एप्रिल रोजी टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका इमारतीमध्ये तरुणीचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला. २९ एप्रिल रोजी या तरुणीच्या नातेवाईकांनी टिळक नगर पोलीस हत्या झाल्याचा संशय व्यक्त करीत तक्रार नोंदवली. या तक्रारीची दाखल घेत कल्याण क्राईम ब्रांचने तिच्या प्रियकराला अटक केली. आरोपीचा नाव सुभाष भोईर आहे. आरोपीला कल्याण दुर्गाडी पुल येथून ताब्यात घेण्यात आले. आरोपी सुभाष भोईर हा एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे.
यवतमाळ जिल्ह्यात बालविवाहाचा डाव उधळला