उत्तर प्रदेशातील: कानपुर शहरात ‘लव्ह जिहाद’ची एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका मुस्लिम तरुणाने खोटी ओळख सांगून एका हिंदू विद्यार्थिनीवर शारीरिक शोषण केल्याचे समोर आले आहे. आरोपीने विद्यार्थिनीचे शारीरिक शोषण करण्यासह, तिचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो वापरून तिला जबरदस्तीने धर्म परिवर्तन करण्यास भाग पाडल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय प्रकरण?
उत्तर प्रदेशातील कानपुर शहरातील ११वी इयत्तेत शिकणाऱ्या पीडित विद्यार्थिनीची दोन वर्षांपूर्वी आरोपीसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. आरोपी नियाज अहमद खानने फेबूकवर आपले खाते ‘बेबी राजा’ या नावाने उघडले होते. या बनावट नावाने त्याने विद्यार्थिनीशी मैत्री केली. त्यानंतर दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघे ही एकमेकांच्या जवळ आले.
खरे नाव समजताच…
विद्यार्थिनीला खरे नाव ‘बेबी राजा’चे खरे नाव नियाज अहमद खान असल्याचे समजताच तिने त्याला टाळण्यास सुरवात केली. शिवाय त्याला भेटण्याचाही विरोध केला. यांनतर, नियोजन माफी मागण्याच्या बहाण्याने तिला द्विवेदी मेंशन हॉटेलमध्ये बोलावले. तिथे आरोपीने कोल्ड्रिंकमध्ये नशेचा पदार्थ मिसळून त्याने विद्यार्थिनीला पाजला. ज्यामुळे तीच शुद्ध हरपून गेलं. याच संधीचा फायदा घेऊन नियाजने तिचे शारीरिक शोषण केले. त्याचबरोबर तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ व फोटो काढले, असा पीडित मुलीने आरोप केला आहे.
त्यानंतर दुसऱ्याच दिवसापासुन आरोपीने ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. व्हिडिओ व्हायरलकरण्याची धमकी देत तिच्यावर जबरदस्तीने धर्म परिवर्तन करण्याचा दबाव टाकण्यास सुरवात केली. या त्रासासला कंटाळून विद्यार्थिनीने अखेरीस कुटुंबीयांना घडलेली हकीकत सांगितली. रावतपूर पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याने, कुटुंबीयांनी थेट पोलीस आयुक्तांची भेट घेतली. आयुक्तांची तात्काळ दखल घेत नियाज अहमद खानला अटक करण्याचे आदेश देण्यात आले.
पाच भावांनी मिळून बहिण आणि भावोजीची केली निर्घृण हत्या
उत्तर प्रदेशातील येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेम विवाहातून केल्याने तरुणीच्या पाच भावांनी मिळून आपल्या बहीण आणि भाऊजीची हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्या केलेल्या तरुणीचे नाव मुन्नी गुप्ता असे आहे तर तरुणाचे नाव दुखन साव असे आहे. हत्या केल्या नंतर मृतदेह जंगलात फेकून दिले. हि घटना उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात घडली आहे.