मध्यप्रदेश: मध्यप्रदेश येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने विधवा महिलेवर अॅसिड अटॅक केल्याचे समोर आले आहे. हे भयानक कृत्य दुसरं तिसरं कोणी नाही तर पीडितेच्या दिराने केल्याचे समोर आले आहे. पण त्याने हे का केलं? हे जाणून तुम्हाला देखील धक्काच बसेल.
आरबीआयचा इशारा: २०२५ पासून डिजिटल फसवणुकीत वाढ, बँकांनी सावध राहा!
नेमकं प्रकरण काय?
संबंधित थरारक घटना मध्यप्रदेश येथील ग्वालियर जिल्ह्यातील कंपू पोलीस स्टेशन हद्दीतील आवडपुरा परिसरात घडली. पीडित महिलेच्या पतीचा गंभीर आजारामुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे पीडितेच्या महिलेचा दिराला पिडीतेसोबत लग्न करायचे होते. परंतु महिलेने त्याला नकार दिला. याच संतापाच्या भरात शुक्रवारी (7 नोव्हेंबर) संध्याकाळी पीडितेच्या माहेरच्या घरात घुसला आणि दीराने अॅसिडने हल्ला केला. या हल्ल्यात पीडिता गंभीररित्या जखमी झाली. उपचारांसाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रकरणातील आरोपीचं नाव मुशीर खान असल्याची माहिती आहे.
गंभीर जखमी
आरोपी हा पीडितेवर लग्नासाठी सतत दबाव टाकायचा. पीडित महिलेने आरोपीला लग्नासाठी स्पष्टपणे नकार दिला होता. याच रागातून आरोपी संतापला आणि त्याने हे भयानक कृत्य केलं. आरोपीने पीडितेवर केलेल्या हल्ल्यात तिचा पूर्ण चेहरा, हाथ आणि पाय पूर्णपणे भाजल्याचं समोर आले आहे. या घटनेच्या वेळी पीडिता तिच्या घरात भाजी चिरत होती. तेव्हा, अचानक तिच्या दीराने घरात घुसून तिच्यावर हल्ला केला.
आरोपीच्या पत्नीचा देखील निधन
काही महिन्यांपूर्वी, पीडित महिलेच्या पतीचा गंभीर आजारामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर, पत्नी तिच्या माहेरीच राहत होती. संबंधित महिलेला एका 10 वर्षांचा मुलगा आणि एक 4 वर्षांची मुलगी आहे. तसेच, आरोपी मुशीर खानच्या पत्नीचं सुद्धा निधन झालं होतं. दरम्यान, आरोपीला तिच्या लहान वहिनीसोबत लग्न करायचं होतं. याच कारणामुळे तो सतत मुलांना भेटण्याच्या बहाण्याने पीडितेच्या माहेरी जायचा.
आरोपीला अटक
या हल्ल्याची माहितीमिळताच स्थानिकांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली. पोलिसांना या प्रकरणाबाबत माहिती मिळताच त्यांनी आरोपीला रात्री ताब्यात घेतला. सध्या पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याची चौकशी सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.
कारवाईची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल 99 लाखांना घातला गंडा
Ans: ग्वालियर
Ans: मुशीर खान
Ans: नकार






