Crime News Live Updates
एचआयव्ही बाधित अल्पवयीन मुलीवर नराधमाने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. लातूरच्या औसा तालुक्यातील एका नामांकित एचआयव्ही बाधित संस्थेमध्ये हा प्रकार घडला. लातूरच्या औसा तालुक्यात एक नामवंत एचआयव्ही बाधित संगोपन संस्था आहे. याठिकाणी रुग्णांची सुश्रुषा केली जाते. या ठिकाणीच असा गंभीर प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरून धाराशिव तालुक्यातील ढोकी पोलिस ठाण्यात ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संस्थेतील आणखी काही मुलींवर अत्याचार झाला असल्याची तक्रार मुलींनी केली असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
26 Jul 2025 04:25 PM (IST)
उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात शनिवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. कोतवाली परिसरातील मोहल्ला किल्ला बाजारिया येथील शिवमंदिरात पूजा करत असलेल्या 21 वर्षीय तरुणीवर एका तरुणाने सलग तीन गोळ्या झाडल्या. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जखमी तरुणीची प्रकृती गंभीर आहे.
26 Jul 2025 04:22 PM (IST)
'अॅक्सिस बँके'च्या एटीएममध्ये बनावट नोटा भरून फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा कोल्हापूरच्या गडहिंग्लज पोलिसांनी माग काढत थेट बांगलादेश सीमेपर्यंत छडा लावला आहे. या कारवाईत मलिक अफसरअली शेख (32) आणि टोनी जहरुद्दीन शेख (23) या दोघांना अटक करण्यात आली आहे. हे दोघेही पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील फराका तालुक्यातील परसुजापूर येथील रहिवासी आहेत.
26 Jul 2025 04:15 PM (IST)
बिहारमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काल गुरुवारी रात्री भोजपूर जिल्ह्यातील अयार पोलीस स्टेशन परिसरातील भेदरी गावात एक कुटुंबातील दोन भावांवर जमिनिच्या वादातून गोळीबार केला. शेत नांगरण्याच्या वादातून सशस्त्र आरोपींनी दोन भावांवर गोळ्या झाडल्या.
26 Jul 2025 04:05 PM (IST)
मिरा-भाईंदर शहरातील अनेक जुन्या इमारतींच्या सोसायट्यांना 7/12 उताऱ्यावर नाव चढवण्यासाठी वर्षानुवर्षे सरकारी यंत्रणेच्या दिरंगाईचा सामना करावा लागत होता. कन्व्हेन्स आणि डिम्ड कन्व्हेन्स झाल्यानंतरही सोसायटीचे नाव 7/12 वर नोंदवले जात नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत होत्या. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी पुढाकार घेत उपतहसीलदार कार्यालयात एकदिवसीय विशेष शिबिर आयोजित केले.
26 Jul 2025 04:05 PM (IST)
अहिल्यानगर शहरातील दिल्लीगेट परिसरातील म्युनिसिपल कॉलनीत गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास दोन गटांमध्ये झालेल्या जोरदार हाणामारीमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. लाठ्याकाठ्यांनी एकमेकांवर तुटून पडलेल्या या झटापटीत काही महिला आणि युवक जखमी झाले असून, घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गोंधळ आणि तोडफोड झाल्याचे समजते.
26 Jul 2025 03:55 PM (IST)
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २१ जुलै रोजी अर्धापूर तालुक्यातील एका गावातील तीन महाविद्यालयीन तरुणी मित्रांबरोबर तामसा रोडवरील एका लॉजवर गेल्या होत्या. त्यापैकी एका तरुणीच्या भावाला बहीण लॉजवर गेली असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच भाऊही आपल्या दोन मित्रांसह तिथे पोहचला. बहिणीला एका तरुणाबरोबर पाहताच भावाचा संताप अनावर झाला. आणि त्याने त्याठिकाणीच वाद घातला.
26 Jul 2025 03:45 PM (IST)
प्रतापगड आणि चंदौलीमध्ये जलद गोळीबारानंतर, अलीगढमध्ये गोळ्या झाडण्यात आल्या. भाजप खासदार सतीश गौतम यांचे जवळचे भाजप कार्यकर्ता आणि प्रॉपर्टी डीलर सोनू चौधरी यांची शुक्रवारी अलीगढच्या हरदुआगंज पोलिस स्टेशन परिसरातील कोंडारा गावात दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गाडी थांबवली. एकाने गाडीत जाऊन त्याच्या शेजारी असलेल्या सीटवर बसून बोलायला सुरुवात केली. दुसरा बाहेर उभा असताना. त्यानंतर डोक्याला आणि चेहऱ्याला लक्ष्य करून आतून आणि बाहेरून जलद गोळीबार करण्यात आला, ज्यामध्ये सोनूला सहा गोळ्या लागल्या. कुटुंबाला अद्याप कोणावरही संशय आलेला नाही. तथापि, १० वर्षांपूर्वी सोनूच्या मोठ्या भावाचीही गोळीबार करण्यात आला होता. जमिनीच्या वादाचीही चर्चा आहे. पोलिस सर्व पैलूंची चौकशी करत आहेत.
26 Jul 2025 03:35 PM (IST)
लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने एकाच दिवशी उत्तर प्रदेशातील दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये दोघांना बळी बनवले आहे. सहारनपूरमध्ये शिक्षण विभागातील एका बाबूला पाच हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले, तर मिर्झापूरमध्ये एका लेखपालला दहा हजारांची लाच घेताना पकडण्यात आले. सहारनपूरमध्ये बाबूला जिल्हा शाळा निरीक्षक कार्यालयातून अटक करण्यात आली आहे. त्याने यू-डायस पोर्टलवर प्रवेश आयात करण्याच्या बदल्यात पैसे घेतले होते. तर मिर्झापूरमध्ये लेखपालने एक बिस्व जमीन ताब्यात घेण्यासाठी पैसे मागितले होते.
26 Jul 2025 03:25 PM (IST)
बिहारच्या गया जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक शहर बोधगया येथून एक लज्जास्पद घटना समोर आली आहे. बीएमपी-३ मध्ये होमगार्ड भरतीसाठी आलेल्या एका मुलीवर रुग्णवाहिकेत ३-४ तरुणांनी सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणात पोलिसांनी रुग्णवाहिकेच्या चालक आणि तंत्रज्ञांना अटक केली आहे. २६ वर्षीय पीडित तरुणी इमामगंज पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी आहे आणि सध्या गयाजी येथील मगध मेडिकल कॉलेज रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना गुरुवारीची आहे जेव्हा होमगार्डसाठी शारीरिक भरती प्रक्रियेदरम्यान महिला उमेदवाराची प्रकृती अचानक बिघडली. यानंतर, तिला बीएमपी-३ कॅम्पसमधून रुग्णवाहिकेने तात्काळ मगध मेडिकलमध्ये पाठवण्यात आले. पीडिता रुग्णालयात पोहोचली तेव्हा ती बेशुद्ध होती.
26 Jul 2025 03:15 PM (IST)
बिहारमधील बक्सरमध्ये पार्टी करताना एका तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मृताचे नाव राजू असे आहे. तो शहरातील नया बाजार मठिया मोड येथील रहिवासी बिरबल सिंग यांचा २३ वर्षीय मुलगा आहे. गुरुवारी रात्री उशिरा राजू त्याच्या मित्रांसोबत पार्टी करत होता असे सांगण्यात येत आहे. यादरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी त्याच्या तीन मित्रांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तथापि, मित्रांवर हत्येचा आरोप आहे.
26 Jul 2025 03:06 PM (IST)
बीडच्या सिरसाळा येथे पोलिसांनी कारवाई करत विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले आहे.सिरसाळा - मोहा रस्त्यावरील खदानी जवळ ही कारवाई करण्यात आलीय. कारवाईत जप्त केलेले पिस्तूल राम धोत्रे याने करण कुऱ्हाडे आणि अशोक पवार यांच्याकडून खरेदी केले होते.सिरसाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षकांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.दरम्यान या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत.
26 Jul 2025 03:05 PM (IST)
नोएडाच्या मेट्रो हॉस्पिटलमध्ये कॅशलेस उपचारांच्या नावाखाली ९ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात सायबर क्राइम पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी शुक्रवारी आणखी एका आरोपीला अटक केली. दिल्लीतून अटक केलेला आरोपी हा फक्त ९वी पास आहे आणि गेल्या दोन वर्षांत त्याच्या खात्यात ८१ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार झाले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आधीच चार आरोपींना अटक केली आहे. आणखी एक आरोपी अजूनही फरार आहे.
26 Jul 2025 02:55 PM (IST)
बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील नवीनगर येथे लग्नाच्या अवघ्या एका महिन्यानंतर ज्या काकाच्या प्रेमापोटी पत्नीने तिच्या पतीची गोळ्या घालून हत्या केली तो काका ११०० किमी अंतरावरील राजस्थानमधील एका हॉटेलमधून पकडला गेला.
26 Jul 2025 02:45 PM (IST)
संगमेश्वर तालुक्यात घरातील कामाच्या वादातून एका सुनेने आपल्या सासऱ्याच्या अन्नात विष टाकण्याचा प्रयत्न केला. स्वप्नाली सोलकर नावाच्या या महिलेने रागातून हे कृत्य केले, ज्यामुळे तिचे सासरे आणि पती दोघेही आजारी पडले. पोलिसांनी स्वप्नालीला अटक केली असून तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. घरातील कलह आणि त्याचे गंभीर परिणाम या घटनेतून स्पष्ट झाले आहेत.
26 Jul 2025 02:35 PM (IST)
एक महिला नवऱ्याच्या मित्रावर विश्वास ठेऊन कॅफेमध्ये पोहोचली. तिथे तिच्यासोबत जे घडलं, त्याने अंगावर काटा येईल. नवऱ्याचा मित्र महिलेला कॅफेच्या सिक्रेट केबिनमध्ये घेऊन गेला. तिथे त्याने मित्राच्या पत्नीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. महिला ओरडत राहिली पण कोणी तिच्या मदतीला आलं नाही. अखेरीस त्याने महिलेला धमकी दिली की, या बद्दल कुठे कोणाजवळ बोललीस तर वाईट परिणाम होतील. मी तुला जिवानीशी संपवीन. मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये हे कांड झालय.
26 Jul 2025 01:47 PM (IST)
वाखारी (ता. दौंड) येथील न्यू अंबिका कला केंद्रात झालेल्या गोळीबारप्रकरणी गुरुवारी (दि २४) पहाटे पोलिसांनी संशयित आरोपी कैलास ऊर्फ बाळासाहेब हिरामण मांडेकर, गणपत बाजीराव जगताप, रघुनाथ शंकर आव्हाड या तिघांना पुण्यातून अटक केली आहे. यामध्ये भोर वेल्हाचे आमदार शंकर मांडेकर यांच्या भावाचा समावेश आहे. आरोपींना सोमवारी (दि २५) मोठ्या पोलिस बंदोबस्तात दौंड न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत (दि २८) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
26 Jul 2025 01:40 PM (IST)
पंतप्रधान मोदी सध्या मालदीवच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांच्या आमंत्रणावरुन हा दौरा होत आहे. दरम्यान पंतप्रधान मोदी शनिवारी (२६ जुलै) मालदीवच्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले आहेत. मालदीव आज त्यांच्या स्वातंत्र्यांचा हरीक महोत्सव साजरा करत आहे. यासाठी पंतप्रधान मोदींना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण देण्यात आले आहे. भारत आणि मालदीवचे संबंध दृढ असल्याचे यावरुन स्पष्ट होते.
26 Jul 2025 01:20 PM (IST)
हडपसर भागातील टिपू पठाण टोळीतील मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट पाचने तेलंगणा राज्यातील हैद्राबाद येथील मियापुर येथून बेड्या ठोकल्या आहेत. फैयाज गफार बागवान (२८, मुळ रा. खाजा मंजिल गल्ली नंबर १७ च्या समोर, सय्यदनगर, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे.
26 Jul 2025 01:19 PM (IST)
पुण्याहून निघालेल्या रुग्णवाहिकेचा अपघात झाला. ही रुग्णवाहिका नागपूर-जबलपूर महामार्गावर बिघडली होती. चालकाने रुग्णवाहिका एका बाजूला उभी करून वाहकाला मेकॅनिक शोधण्यासाठी पाठवले होते. या दरम्यान भरधाव असलेल्या अज्ञात वाहनाने रुग्णवाहिकेला जोरदार धडक दिली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला.
26 Jul 2025 01:02 PM (IST)
चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना घडली आहे. शनिवारवाडा परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ६३ वर्षीय महिलेने फरासाखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
26 Jul 2025 12:31 PM (IST)
अक्कलकोट : अक्कलकोट शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनेत वाढ होत आहे. अक्कलकोटची प्रतिमा मलीन होत आहे. भाविकांना मारहाणीचा प्रकार, शाईफेक करून हल्ला घटनेने महाराष्ट्रभर नव्हेतर देशपातळीवर चर्चा झाली. आता पेट्रोल पंपावरील घटनेने आणखीन चिंता वाढली आहे. दोन जणांनी पेट्रोल पंपावरील कामगारास गाडीमध्ये त्या पेट्रोलचे पैसे का मागतोस म्हणून मारहाण केली. पैसे मागितले तर पेट्रोल पंप उडवून देण्याची धमकी दिली.
26 Jul 2025 12:09 PM (IST)
भरधाव कारने दिलेल्या धडकेत एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मुकुंदनगर भागात घडली आहे. याप्रकरणी पसार झालेल्या चालकाविरुद्ध स्वारगेट पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकेश देवीलाल गुजर (वय २८, रा. झांबरे पॅलेसजवळ, महर्षीनगर) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत पोलीस कर्मचारी सुरेश गायकवाड यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
26 Jul 2025 11:50 AM (IST)
माणगाव पोलिसांनी ‘ट्युबक्राफ्ट प्रेसिजन प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीतून सुमारे 33 लाख 10 हजार रुपयांची मशिनरी आणि इतर साहित्य चोरून नेणाऱ्या सहा आरोपींच्या टोळीला अटक केली आहे. ही कारवाई गोपनीय माहिती आणि तांत्रिक कौशल्याच्या आधारे करण्यात आली, अशी माहिती माणगाव पोलिसांनी दिली.
26 Jul 2025 11:48 AM (IST)
बिहारच्या गया जिल्ह्यातून एक लज्जास्पद प्रकरण समोर आले आहे. बोधगया पोलीस स्टेशन परिसरातील बीएमपी-३ परेड ग्राउंडवर होमगार्ड भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या एका तरुणीवर रुग्णालयात नेत असताना रुग्णवाहिका चालक आणि तंत्रज्ञांनी बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही घटना 24 जुलैला घडली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.