मुंबई: मुंबईच्या शिवाजीनगर परिसरातून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. एका जन्मदात्या आईनेच आपल्या पोटच्या ६ महिन्याच्या बाळाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गोवंडीच्या बैंगणवाडी येथे घडली आहे. आरोपी महिलेने बाळ झोपाळ्यात झोपलेला असतांना उशीने मुलाचे तोंड दाबून हत्या केली. या हत्येनंतर महिला स्वतः पोलीस ठाण्यात गेली आणि हत्येची कबुली पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपी महिले विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
एका जन्मदात्या आईनेच आपल्या पोटच्या ६ महिन्याच्या चिमुरड्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. बाळ झोपाळ्यात झोपलेलं असतांना उशीने तोंड दाबून हत्या केली. ही घटना गोवंडीच्या बैंगणवाडी येथील गुरुवारी घटना घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी ४२ वर्षीय आईला अटक केली आहे. गुरुवारी दुपारीच तिने आपल्या सहा महिन्यांच्या मुलाची पाळण्यात झोपलेला असताना उशीने तोंड दाबून हत्या केल्याचे सांगितले. ही महिला बैंगनवाडीत आपल्या आई-वडिलांसोबत राहते. नंतर शिवाजीनगर पोलिसांनी महिलेचे घर गाठले. तेव्हा घरातील झोपाळ्यात बाळ निपचित पडून होते. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत राजावाडी रुग्णालयात नेले. तेथे त्या बाळाला मृत घोषित केलं.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी महिला सुलताना अब्दुल खान हिच्या विरोधात कलम १०३ भा न्या सं अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस अधिक तपास करत आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने एकदा नाही तर तीन वेळा लग्न केलं. संसार थाटण्याचा प्रयत्न केला मात्र तिन्ही वेळा संसार टिकला नाही. त्यानंतर तिचे एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. त्या नात्यातून ती गर्भवती राहिल्यानंतर तो प्रियकर देखील पळून गेला. सहन महिन्यापूर्वी तिने या बाळाला जन्म दिला. त्यानंतर आईला गंभीर आजार झाल्याचे निदान झाले. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने आणि वैधकीय खर्च वाढल्याने ती मानसिकदृष्ट्या खचल्याचे पोलिसांना सांगितले.
IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल
दरम्यान, पवईत आयआयटी बॉम्बे मध्ये शिक्षण घेणाऱ्या तरुणानं नैराश्यातून होस्टेलच्या इमारतीवरून उडी मारत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थी आयआयटी बॉम्बेमध्ये शिक्षण घेत होता. शिक्षणाच्या तणावातून त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. रात्री उशिरा होस्टेलच्या इमारतीवरून उडी घेऊन त्याने आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पवई पोलीस दाखल झाले असून अधिक तपास पोलीस करीत आहे.
खड्ड्याने घेतला जेष्ठ नागरिकाचा जीव; कारचे चाक डोक्यावरून गेले अन्…