• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Massive Cyber Fraud Attack In Navi Mumbai Thane Area

Navi Mumbai: नवी मुंबई-ठाणे परिसरात सायबर फसवणूकचा प्रचंड प्रहार, एकाच दिवशी १ कोटींहून अधिक रुपये नागरिकांकडून उकळले

नवी मुंबई-ठाणे परिसरात १० ऑक्टोबरला ५ ठिकाणी सायबर फसवणूक, नागरिकांकडून एकूण १ कोटींहून अधिक रुपये उकळले. फेक ट्रेडिंग, WhatsApp ग्रुप आणि ऑनलाइन गुंतवणूक स्कॅमची नोंद.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Oct 12, 2025 | 01:36 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नवी मुंबई आणि ठाणे परिसरातून सायबर गुन्हेगारीची घटना समोर आली आहे. एकाच दिवशी म्हणजेच १० ऑक्टोबर २०२५ रोजी, कळंबोली, कामोठे, सायबर पोलीस ठाणे, कोपरखैरणे आणि न्हावाशेवा या पाच ठाण्यांत एकापाठोपाठ एक असे सायबर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले. विविध प्रकारच्या ऑनलाईन गुंतवणुकींच्या नावाखाली तब्बल १ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम नागरिकांकडून लुबाडण्यात आल्याचे समोर आले आहे.

यूट्यूबवरून हत्या आणि मृतदेह विल्हेवाट लावण्याची पद्धत शिकली, समलैंगिक संबंधातून मित्राची निर्घृण हत्या करून केले तुकडे

पहिली घटना: कळंबोली

पहिली घटना कळंबोली येथे घडली. सेवानिवृत्त नागरिक सौरेन्द्रनाथ चक्रवर्ती (६२) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आरोपींनी त्यांना शेअर मार्केट ट्रेंडिंगमध्ये अधिक नफा मिळेल असे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. त्यानंतर ऑनलाईन व्हायव्हरांच्या माध्यमातून चक्रवर्ती यांच्या खात्यातून ₹44,70,009 इतकी रक्कम आरोपींनी फसवून घेतल्याची नोंद आहे. या प्रकरणी गुन्हा भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66(D) अन्वये नोंदवला असून, तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कांबळे यांच्या कडे आहे.

दुसरी घटना: कामोठे

कामोठे येथील रहिवासी चेतन सदाशिव पाटील (४४) यांना “Savart Wealth Growth Community” आणि “Savart 1 to 1 Service” या नावाने तयार केलेल्या फेक WhatsApp ग्रुपमध्ये सामील करून गुंतवणुकीवर पाच ते दहा पट नफा मिळेल असे सांगण्यात आले. फिर्यादीकडून विविध बँक खात्यातून ₹16,54,000/- रक्कम भरून घेण्यात आली. मात्र त्यांना नफा न देता सायबर फसवणूक करण्यात आली. गुन्हा भा.दं.वि. कलम ४२०, ४०७, ३४ व आयटी अॅक्ट ६६(D), ६६(C) प्रमाणे दाखल करण्यात आला असून तपास वपोनि विमल बिडवे करत आहेत.

तिसरी घटना: नवी पनवेल

नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, अश्विन गुरव (४१) या नवी पनवेल येथील नोकरी करणाऱ्या व्यक्तीला ‘मराठी मॅट्रीमोनी’ वेबसाईटवरून संपर्क साधून फेक ट्रेडिंग वेबसाईट (pc.marketaxesa.com) वर गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले. गुंतवणुकीसाठी लिंक व खोटे कस्टमर केअर क्रमांक देत आरोपींनी फिर्यादीकडून ₹53,70,000/- इतकी रक्कम उकळली. सायबर पोलिसांनी या प्रकरणी BNS कलम ३१८(४), ३१९(२), ३(५) व IT Act 66(D) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून तपास वपोनि विशाल पाटील यांच्या कडे आहे.

चौथी घटना: कोपरखैरणे

कोपरखैरणे येथे राहणाऱ्या श्रीमती विनीता साईगणेश (५५) या गृहिणीने Facebook वर पाहिलेल्या स्टॉक मार्केटच्या व्हिडिओवर विश्वास ठेवला आणि दिलेली लिंक क्लिक केली. त्यानंतर IIFL Securities Limited नावाच्या खोट्या WhatsApp ग्रुपची अॅडमिन बनून एका अनोळखी महिलेनं त्यांना फसवलं. “IPO” आणि “Block Trading” या नावाखाली वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ₹7,76,250/- रुपये भरायला लावून परत न केल्याने तक्रार दाखल झाली आहे. गुन्हा IT Act 66(C) अंतर्गत दाखल झाला असून, तपास पोउपनि गजानन टाकळे करत आहेत.

पाचवी घटना : न्हावाशेवा

न्हावाशेवा पोलीस ठाण्यांत दाखल प्रकरणानुसार, प्रतिभा हरले (४२) या गृहिणीला आरोपी गायत्री लोंढेकर हिने शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये दोन ते चार महिन्यांत दुहेरी रक्कम मिळेल, असे आमिष दाखवले. फिर्यादी, त्यांच्या पती दिनेश हरले आणि साक्षीदार पुनम चौधरी यांच्याकडून एकत्रितपणे ₹58,05,000/- इतकी रक्कम घेतली. त्यातील केवळ थोडी रक्कम “परतावा” म्हणून दिल्यानंतर आरोपीने उर्वरित पैसे परत केले नाहीत. हा गुन्हा महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण अधिनियम १९९९ कलम ३ आणि भा.दं.वि. ४२०, ४०६ प्रमाणे दाखल करण्यात आला असून तपास सपोनि गणेश पाटील यांच्या कडे आहे.

Nashik Accident: नाशिकमध्ये भीषण अपघात!आजीच्या डोळ्यादेखत आठ वर्षीय चिमुरडीचा ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यू

Web Title: Massive cyber fraud attack in navi mumbai thane area

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2025 | 01:36 PM

Topics:  

  • crime
  • Navi Mumbai
  • Navi Mumbai Crime

संबंधित बातम्या

Mumbai Crime: मीटिंगच्या बहाण्याने महिलेला ऑफिसमध्ये बोलावले, बंदुकीच्या धाकावर कपडे उतरवले, नग्न फोटो-व्हिडिओ काढत…
1

Mumbai Crime: मीटिंगच्या बहाण्याने महिलेला ऑफिसमध्ये बोलावले, बंदुकीच्या धाकावर कपडे उतरवले, नग्न फोटो-व्हिडिओ काढत…

Pune Crime: शेवटची भेट ठरली जीवघेणी! आधी प्रेयसीला संपवलं, नंतर स्वतः उचलले टोकाचे पाऊल; पुण्यातील थरारक प्रकरण
2

Pune Crime: शेवटची भेट ठरली जीवघेणी! आधी प्रेयसीला संपवलं, नंतर स्वतः उचलले टोकाचे पाऊल; पुण्यातील थरारक प्रकरण

Mumbai Crime: नवरा पोलीस, मात्र सासरच्या छळाने बायकोने लावला गळ्याला दोर! मुंबईतली घटना
3

Mumbai Crime: नवरा पोलीस, मात्र सासरच्या छळाने बायकोने लावला गळ्याला दोर! मुंबईतली घटना

Nashik Crime: संतापजनक! मानलेल्या मामाकडून दोन भाचींवर अत्याचार, नाशिक येथील घटना
4

Nashik Crime: संतापजनक! मानलेल्या मामाकडून दोन भाचींवर अत्याचार, नाशिक येथील घटना

ताज्या बातम्या

पुढे वाचा
तुर्कीच्या मानवरहित ‘Bayraktar KIZILELMA’ फायटर जेटने केली अविश्वसनीय कामगिरी; ‘हा’ VIRAL VIDEO पाहून समजेल नक्की काय घडलं?

तुर्कीच्या मानवरहित ‘Bayraktar KIZILELMA’ फायटर जेटने केली अविश्वसनीय कामगिरी; ‘हा’ VIRAL VIDEO पाहून समजेल नक्की काय घडलं?

Dec 01, 2025 | 10:49 AM
BCCI ने बोलावली तातडीची बैठक, दुसऱ्या ODI पूर्वी गंभीर-आगरकरवर टांगती तलवार, RoKo बाबत घेणार मोठा निर्णय?

BCCI ने बोलावली तातडीची बैठक, दुसऱ्या ODI पूर्वी गंभीर-आगरकरवर टांगती तलवार, RoKo बाबत घेणार मोठा निर्णय?

Dec 01, 2025 | 10:37 AM
BIGG BOSS 19: ‘आप लोमड़ी हो…’ मीडियाने प्रश्न विचारताच संतापला गौरव, फरहानाला चांगलेच सुनावले

BIGG BOSS 19: ‘आप लोमड़ी हो…’ मीडियाने प्रश्न विचारताच संतापला गौरव, फरहानाला चांगलेच सुनावले

Dec 01, 2025 | 10:31 AM
Smartphones Launched In November: नोव्हेंबर स्मार्टफोन्सचा धमाका! ‘हे’ हाय-एंड मॉडेल्स ठरले होते सुपरहिट, वाचा संपूर्ण यादी

Smartphones Launched In November: नोव्हेंबर स्मार्टफोन्सचा धमाका! ‘हे’ हाय-एंड मॉडेल्स ठरले होते सुपरहिट, वाचा संपूर्ण यादी

Dec 01, 2025 | 10:26 AM
संतापजनक! कॅनडात भारतीय कामगारासोबत गैरवर्तन; वर्णावरुन शिवीगाळ केला अन्…, VIDEO VIRAL

संतापजनक! कॅनडात भारतीय कामगारासोबत गैरवर्तन; वर्णावरुन शिवीगाळ केला अन्…, VIDEO VIRAL

Dec 01, 2025 | 10:24 AM
World AIDS Day 2025 : AIDS इन्फेक्शन कशामुळे पसरतो? संसर्ग टाळण्यासाठी ‘हे’ उपाय ठरतील प्रभावी

World AIDS Day 2025 : AIDS इन्फेक्शन कशामुळे पसरतो? संसर्ग टाळण्यासाठी ‘हे’ उपाय ठरतील प्रभावी

Dec 01, 2025 | 10:24 AM
‘नाते तुटणार नाही’, पण प्रश्न राहतोच…’ Sheikh Hasina यांच्या प्रत्यार्पणाबाबत Bangladeshची कठोर भूमिका; पण भारत सरकार मौन

‘नाते तुटणार नाही’, पण प्रश्न राहतोच…’ Sheikh Hasina यांच्या प्रत्यार्पणाबाबत Bangladeshची कठोर भूमिका; पण भारत सरकार मौन

Dec 01, 2025 | 10:24 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Uran News : उरणचा ऐतिहासिक द्रोणागिरी किल्ला मोजतोय शेवटच्या घटिका

Uran News : उरणचा ऐतिहासिक द्रोणागिरी किल्ला मोजतोय शेवटच्या घटिका

Nov 30, 2025 | 06:52 PM
Latur News :  उदगीरनगर परिषदेसाठी चौरंगी लढत, काँग्रेसकडून प्रचाराला वेग

Latur News : उदगीरनगर परिषदेसाठी चौरंगी लढत, काँग्रेसकडून प्रचाराला वेग

Nov 30, 2025 | 06:41 PM
Kalyan : ‘खोटे कागदपत्र तयार करून जमीन लाटण्याचा प्रयत्न’ पिडीत शेतकरी आक्रमक

Kalyan : ‘खोटे कागदपत्र तयार करून जमीन लाटण्याचा प्रयत्न’ पिडीत शेतकरी आक्रमक

Nov 30, 2025 | 06:26 PM
Ajit pawar : जयकुमार गोरेंची अजित पवार , ओमराजे आणि उत्तम जाणकारांवर जोरदार टीका

Ajit pawar : जयकुमार गोरेंची अजित पवार , ओमराजे आणि उत्तम जाणकारांवर जोरदार टीका

Nov 30, 2025 | 06:17 PM
Ratnagiri News : चिपळूणमध्ये एकनाथ शिंदेंचा प्रचार; लाडकी बहीण योजना कायम राहील, विकासासाठी निधीची खात्री

Ratnagiri News : चिपळूणमध्ये एकनाथ शिंदेंचा प्रचार; लाडकी बहीण योजना कायम राहील, विकासासाठी निधीची खात्री

Nov 30, 2025 | 06:09 PM
Sindhudurg : निलेश राणेंचा नितेश राणे व कणकवली सभेवर प्रत्युत्तर; भाजप ऑफर नाकारली

Sindhudurg : निलेश राणेंचा नितेश राणे व कणकवली सभेवर प्रत्युत्तर; भाजप ऑफर नाकारली

Nov 30, 2025 | 05:57 PM
Uday Samant : “रविंद्र चव्हाणांवर बोलण्यासाठी निलेश राणेंचा वापर? भावाची टीका, सामंत काय म्हणाले?

Uday Samant : “रविंद्र चव्हाणांवर बोलण्यासाठी निलेश राणेंचा वापर? भावाची टीका, सामंत काय म्हणाले?

Nov 30, 2025 | 01:30 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.