दोस्तीत कुस्ती! मित्राने केला साथीदारांच्या मदतीने मित्राचा खून; कारण काय तर…
काय घडलं नेमकं?
काल संध्याकाळी बोरिवली लोकलमधून येत असताना मालाड स्थानकावर उतरत असताना ओमकार शिंदे यांच्यासमोर उभे असलेल्या आलोक सिंह यांच्याशी त्याचा वाद झाला. आलोक सिंग यांना पुढे सरकण्यासाठी आरोपी ओंकार शिंदे ढकलत होता, पुढे महिला उभी असल्याने आलोक सिंग यांनी धक्का मारू नको, असे म्हटले. या किरकोळ वादाचे रूपांतर भांडणात झाले आणि उतरतानाच खिशात असलेल्या चिमट्याने आरोपीने आलोक सिंग यांच्या पोटात वार केला. सीसीटीव्हीतील दृश्यानुसार ओंकार शिंदे हा फक्त एकच वार करुन पळून गेला. मात्र, चिमटा टोकदार असल्याने आलोक यांना गंभीर इजा झाली आणि झालेल्या रक्तस्त्रावाने त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी सीसीटीव्हीचा तपास सुरु केला आणि १२ तासांच्या शोध मोहिमेनंतर मालाड स्थानकातून ताब्यात घेतले होते. त्याला बोरिवली येथील रेल्वे पोलीस मुख्यालयात आणून त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी एक महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली. ओंकार शिंदे याने आलोक सिंह यांच्या पोटात चाकू नव्हे तर हिरेजडित वस्तू हाताळण्यासाठी वापरण्यात येणारा चिमटा खुपसला होता. त्याने मारण्यासाठी वापरलेला चिमटाही फेकून दिला. रेल्वे पोलीस सध्या हा चिमटा शोधत आहेत. पोलीस पुढील कारवाई करत आहे.
मेटलच्या कारखान्यात कामाला
आरोपी ओंकार शिंदे हा मालाडच्या कुरार व्हिलेज येथील रहिवासी आहे. तो दक्षिण मुंबईतील खेतवाडी परिसरात असणाऱ्या एका मेटलच्या कारखान्यात कामाला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून पोलीस तपास करत आहे.
Pune Crime: सोन्याच्या दागिन्यांची मागणी करत होती पत्नी; संतापून पतीने चाकूने वार करत घेतला जीव
काळजाचा ठोका चुकवणारी घटना; आईने 15 वर्षीय मुलीची खलबत्याने ने निर्घृण हत्या
मुंबईच्या नालासोपाऱ्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या आईनेच आपल्या १५ वर्षीय मुलीची खलबत्याने डोकं ठेचून निर्घृण हत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. अंबिका प्रजापती असं या मृत चिमुकलीचे नाव आहे. तर आरोपी आईचे नाव कुमकुम प्रजापती असे आहे. तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना नालासोपाऱ्याच्या पूर्वेकडील विद्या विकास मंडळ चाळ, तांडा पाडा, संतोष भवन परिसरात शनिवारी सायंकाळी घडली.
Ans: मालाड रेल्वे स्थानकात लोकलमधून उतरताना धक्का लागल्यावरून वाद झाला आणि त्यातून हत्या घडली.
Ans: सुरुवातीला चाकू असल्याचे सांगितले जात होते, मात्र तपासात आरोपीने धारदार चिमटा वापरल्याचे निष्पन्न झाले.
Ans: आरोपी ओंकार शिंदे याला रेल्वे पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.






