5 वर्षाची मुलगी खेळत होती, शेजारचा आला अन् उचलून..., मुंबईत संतापजनक घटना (फोटो सौजन्य-एएनआय)
मुंबईत दररोज काहीना काही धक्कादायक घटना समोर येत आहेत. त्यातच शिवडीत एका पाच वर्षीय मुलीवर 30 वर्षाच्या नराधामाने लैगिंक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. चिमुकलीसोबत असा प्रकार केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
मुंबईतील शिवडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली. एका पाच वर्षांच्या मुलीवर लैगिंक शोषण करण्यात आले. त्यामुळे या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिमुकलीवर शेजारच्यानेच लैगिंक शोषण केल्याचे समोर आले. या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. आरएके मार्ग पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
हे सुद्धा वाचा: उरणनंतर आता अमरावतीत मन सुन्न करणारी घटना, एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर चाकूने सपासप वार
चिमुकली अंगाणात खेळत असताना शेजाऱ्याने तिला उचलून स्वत:च्या घरी नेलं आणि तिच्यावर लैगिंक अत्याचार केलं. याप्रकरणी आरएके रोडवर पोलिसांनी 30 वर्षीय नराधमाला अटक केली आहे. आरोपीवर भारतीय न्यायिक संहितेच्या कलम 65(2) आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याच्या कलम 4, 8 आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा: लज्जास्पद! झुकलेली कंबर, सुरकुतलेला चेहरा 85 वर्षांच्या आजी विनवणी करत होत्या पण तो नराधम…
दरम्यान, उरणमधील यशश्री शिंदेच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडावडी. दाऊद शेख नावाच्या आरोपीने २२ वर्षीय यशश्री शिंदेची हत्या केली. तिच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली. विशेष म्हणजे 14 वर्षांच्या यशश्री शिंदेला दुर्घटनेतील आरोपींवर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. मात्र तो या आधी ही तुरुंगात राहून आला आहे.