मुंबईत 29 वर्षीय महिलेवर सामुहिक अत्याचार (फोटो सौजन्य-X)
गेल्या महिन्याभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असून घृणास्पद कृत्य करणाऱ्यांच्या मनात कायद्याची भीती राहिली नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये लैंगिक अत्याचार, लैंगिक शोषन यांसारख्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होतानाचं भयावह चित्र आहे. राज्यात गेल्या दहा दिवसांत आठ जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवरच्या अत्याचाराच्या तब्बल 12 घटना समोर आल्या आहेत.मुंबई , ठाणे, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अकोला, लातूरमध्ये गेल्या काही दिवसांत अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचे समोर आलं आहे. असे असताना मुंबईतील सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेर 29 महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) परिसरात एका २९ वर्षीय महिलेवर दोन अज्ञातांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 22 सप्टेंबरच्या रात्री घडली जेव्हा पीडिता सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेर एकटी उभी होती. त्यावेळी आरोपी त्या महिलेबरोबर बोलण्याचा प्रयत्न करायला लागला. त्यानंतर ती महिला आरडा-ओरड करेल या अनुशंगाने तिचे एकाने तोंड धरले.
पीडितेच्या तक्रारीनुसार, एका आरोपीने तिला आरडाओरड करण्यापासून रोखण्यासाठी तिचे तोंड बंद केले आणि सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या टॅक्सी स्टँडच्या मागे दोघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. ती महिला पळून जाण्यात यशस्वी झाली आणि त्यानंतर स्थानिक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली.या प्रकरणी सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पुढील तपासासाठी माता रमाबाई मार्ग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिस अधिकारी सध्या पुरावे गोळा करून गुन्ह्यात सहभागी असलेल्या संशयितांची ओळख पटविण्याचे काम करत आहेत.
ही महिला सीएसएमटी परिसरात उभी असताना दोन अज्ञात व्यक्तींनी तिच्यावर हल्ला केला.तिने आरडाओरड करु नये म्हणून एकाने तिचे तोंड दाबून दोघांनी तिला निर्जन स्थळी नेल्याचा आरोप आहे. तिला टॅक्सी स्टँडच्या मागे नेऊन आळीपाळीने बलात्कार केला.