सौजन्य - सोशल मिडीया
पुणे : राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. उरण, नाशिकनंतर आता पुणे जिल्ह्यातही हत्येची घटना घडली आहे. दौंड तालुक्यातील खामगाव येथे भरचौकात असलेल्या एका दुकानदाराचा कोयत्याने सपासप वार करीत निर्घृण हत्या करण्यात आली. बहिणीच्या पतीनेच भावाची निर्घृण हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.
सुरज राहुल भुजबळ असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अमित बहिरट असे आरोपीचे नाव आहे. या घटनेने दौंड तालुक्यात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी यवत पोलीस दाखल झाले ते आरोपीचा शोध घेत आहेत.
नेमकं काय घडलं ?
सूरजने बहिणींना घरी आणले म्हणून चिडलेल्या दाजीने अमोल बहिरट याने त्याचा खून केला. वर्दळीच्या चौकात असलेल्या दुकानात घुसून आरोपीने सूरजवर कोयत्याने १५ ते १६ वार केले. त्याने मानेसह, पायावर व पोटावर वार केले. या हल्ल्यात सूरजची मान कापली गेली व तो जागीच गतप्राण झाला. हत्येचा संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.