crime (फोटो सौजन्य - pinterest)
नागपूरमधून एक धक्कादायक घटना घडली आहे. शिवसेनेचे माजी उप जिल्हाप्रमुख अंकुश कडू यांची भर रस्त्यावर हत्या करण्यात आली आहे. भर रस्त्यावर कडू यांची दुचाकी थांबवून धारधार शस्त्राने वार करत हत्या केली आहे. ही हत्या नारी रोड वरील म्हाडा चौकात शनिवारी (१९ एप्रिल) सायंकाळी ६ वाजता सहा तरुणांनी यांची हत्या केली. हत्येचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद करण्यात आला आहे.
लहान मुलाच्या खेळण्यावरुन वाद; दोन गटात जोरदार राडा अन् दगडफेक…
जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत नारी रोडवरील म्हाडा चौक इथं शिवसेनेचे माजी उप जिल्हाप्रमुख अंकुश कडू यांची हत्या करण्यात आली. जुन्या वैमनस्यातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांचा आहे. अंकुश कडू यांची नागपुरात भर रस्त्यात हत्या झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. पोलीस आरोपींचा शोध करत आहे. ही हत्या कोणी केली? का केली? याचा सखोल तपस पोलीस प्रशासन करत आहेत. हत्या करणारे आरोपी फरार झाले आहेत. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे. लवकरच आरोपींना पोलीस पकडतील असं सांगण्यात येत आहे. आरोपी पकडल्यानंतर हत्येचं नेमकं कारण काय? याची माहिती मिळू शकते. मात्र या धक्कादायक घटनेने नागपूर शहर हादरलं आहे.
आइस्क्रीम कारखान्यातील मालकाचा कामगारांवर अमानुष अत्याचार
राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यातील रहिवासी अभिषेक भांभी आणि विनोद भांभी यांना सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशन हद्दीतील खाप्रबत्ती भागात छोटू गुर्जरच्या आइस्क्रीम कारखान्यात काम करण्यासाठी एका कंत्राटदाराने कामावर ठेवले होते. 14 एप्रिल रोजी गुर्जर आणि त्याचा सहकारी मुकेश शर्मा यांनी दोन्ही कामगारांवरती चोरीचा आरोप केला. त्यानंतर दोघांचेही कपडे काढून त्यांना विजेचे झटके देण्यात आले आणि त्यांची नखे उपटली. हा संतापजनक प्रकार छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यात घडला आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये एका अर्धनग्न व्यक्तीला विजेचे झटके दिले जात आहेत आणि मारहाण केली जात आहे. घटनेनंतर दोन्ही पीडित तेथून पळून गेले आणि भिलवाडा येथील त्यांच्या मूळ गावी पोहोचले. त्यांनी भिलवाडा येथील गुलाबपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.