जाणीवपूर्वक वणवा लावाल तर….; Satara वनविभागाची मोठी कारवाई, एक आरोपी अटकेत
काय नेमकं प्रकरण?
पीडित महिलेचे कुटुंब घरगुती ताणतणावात आणि मुलीच्या लग्नातील अडथळ्यांमुळे त्रस्त होते. यासाठी ते धरणगाव येथील महेशगिरी याच्या तथाकथित ‘प्रति गाणगापूर’ मठात गेले. यावेळी भोनि महेशगिरीने महिलेला “बाहेरची बाधा” असल्याचे सांगून भीती घातली. विधीच्या नावाखाली तिला पापनाशक कुंडात अंघोळ घालण्यास लावून ओल्या वस्त्रानिशी उंबराच्या झाडाला फेऱ्या मारण्यास भाग पाडले.
त्यांनतर काही दिवसांनी या भोंदूने पीडितेचा मोबाईल नंबर मिळवून तिला व्हॉट्सॲपवर अश्लील मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. “दैवी विधी आणि मार्गदर्शनासाठी एकांतात यावे लागेल” असे सांगून त्याने पीडितेला नाशिकमध्ये बोलावून घेतले. तिथून तिला नाशिक-त्र्यंबक रोडवरील एका लॉजवर नेले. “माझ्या गळ्यात रुद्राक्ष आहे, माझ्यात दैवी शक्ती आहे, माझे कोणी काही करू शकत नाही,” अशी धमकी देऊन त्याने तिच्यावर अत्याचार केला आणि तिचे आक्षेपार्ह फोटोही काढले.
गुन्हा दाखल
भोंदूंच्या दहशतीमुळे पीडित महिला सुरुवातीला गप्प होती. मात्र तिने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. हा प्रकार नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या कानावर घालण्यात आला. या भोंदूने अशाच प्रकारे अनेक महिला आणि मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे शोषण केल्याची शक्यता पीडितेने आणि अंनिसने व्यक्त केली आहे. पोलीस अधीक्षणाच्या सूचनेनुसार, लासलगाव पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून महेशगिरी काकडे विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीच्या अटकेसाठी रवाना झाले आहेत. उभा गुन्ह्यात मदत करणाऱ्या साथीदारांनाही सहआरोपी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नांदेड पोलिसांची मोठी कारवाई; १० घरफोडी गुन्ह्यांचा छडा; ७८ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त
Ans: नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील धरणगाव (खडक) येथे.
Ans: दैवी शक्ती व भूतबाधा काढण्याच्या नावाखाली महिलेची फसवणूक करून तिच्यावर अत्याचार केला.
Ans: पीडितेने अंनिसकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.






