नाशिक: नाशिक शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका तरुणावर प्राणघातक हल्ला करत टोळक्याने त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. तरुणाचे नाव चंद्रकांत विश्वकर्मा नाव आहे. हा प्रकार प्रकाश लोंढे टोळीकडून दहशत माजवण्यासाठी करण्यात आल्याचा उघडकीस आला आहे. याघटनेमुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली असून सातपूर पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरु आहे.
कसा केला हल्ला?
नाशिकमधील सातपूर परिसरात चंद्रकांत विश्वकर्मा या युवकावर लोंढेच्या टोळीने अचानक हल्ला चढवला. डोक्यावर कोयत्याने सपासप वार करत, नंतर त्याच्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांच्या ताब्यात असूनही गुंडगिरी सुरूच
विशेष म्हणजे, या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वात धक्कादायक बाब म्हणजे टोळीचा मास्टरमाइंड रिपाइंचा जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे आणि दीपक लोंढे आहे. ते
सध्या पोलिसांच्या ताब्यात असूनही त्यांच्या टोळीची गुंडगिरी सुरुच आहे. हे पाहता, लोंढे टोळी थेट पोलिसांनाच “ओपन चॅलेंज” देत असल्याची चर्चा नाशिकमध्ये रंगली आहे. सातपूर पोलिसांनी या घटनेची नोंद घेत तपासाला सुरुवात केली आहे. मात्र, या प्रकरणामुळे सातपूर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आता पोलिसांना या हल्लाखोरांना जेरबंद करण्यात यश कधी मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
भरदिवसा युवकावर धारदार शस्त्राने हल्ला;दुचाकीवरून उतरून थेट तरुणाच्या पोटावर चाकूने सपासप वार
नाशिक शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भरदिवसा एका युवकावर धारदार शस्त्राने थरारक हल्ला करण्यात आला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना पंचवटीतील गजानन चौक परिसरातील कोमटी गल्लीत सोमवारी (दि. 13 ऑक्टोबर) दुपारी घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एक युवक पळत-पळत गजानन चौकातील कोमटी गल्लीत आला. काही क्षणांतच दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांनी त्याचा पाठलाग केला. या दरम्यान त्यांनी दोन मुलींना आणि शाळेच्या व्हॅनला धडक दिली आणि त्यानंतर त्या युवकाला रस्त्यातच गाठले. यानंतर, दुचाकीवरून उतरलेल्या एकाने धारदार शस्त्राने तरुणाच्या पोटावर वार केला. मात्र, परिसरातील काही नागरिकांनी आरडाओरडा करत हस्तक्षेप केल्याने हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. सुदैवाने युवकाला गंभीर दुखापत झाली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
Crime News: उल्हासनगरात पेट्रोल टाकून घर जाळण्याचा प्रयत्न; दोन सराईत गुन्हेगार अटकेत