गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आता पुन्हा एक हत्या झाल्याने नाशिक हादरले आहे. नाशिक शहरातील पंचवटी परिसरातील पेठ रोडवरील फुलेनगर येथील गौडवाडी परिसरात काल (१ जून) मध्यरात्रीच्या सुमारास खून झाल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरु आहे.
सदाशिव पेठेतील अपघातप्रकरणी मोठी अपडेट; तपासातून वाहनचालकाबाबत धक्कादायक माहिती उघड
मृतकाचे नाव संजय तुळशीराम सासे (वय 40) असे आहे. ही घटना पंचवटी पोलीस ठाण्याच्या (Panchavati Police Station) हद्दीतील महापालिकेच्या 56 नंबर शाळेजवळील प्रवीण किराणा दुकानाजवळ घडली. संजय सासे हे ‘बाबागिरी’ करत असल्याचा संशय असल्याचा स्थानिकांनी माहिती दिली. सोमवारी मध्यरात्री काही अज्ञात व्यक्तींनी संजय सासे यांच्या डोक्यावर गंभीर वार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली.
या प्रकरणी संजय सासे यांची पत्नी रुपाली संजय सासे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. पोलिसांनी आतापर्यंत एका संशयित आरोपीला अटक केल्याची माहिती मिळत आहे. या घटनेने परिसरात भीती वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक मध्ये गुन्हेगारी वाढत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढू लागली आहे.
माहेरून पैसे न आणल्यामुळे विवाहित महिलेवर नऊ वर्षांपासून अमानुष छळ
छत्रपती संभाजी नगर मधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. फुलंब्री तालुक्यातील चौकावाडी गावात माहेरून पैसे आणावेत यासाठी एका ३० वर्षीय विवाहितेला दोरीने घरात बांधून बेदम मारहाण करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर तिच्या अंगावर चटके देऊन अमानुष छळ करण्यात आला आहे.
या प्रकरणी पीडितेने तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार पती, सासू- सासरे आणि दोन नणंदांनी मिळून तिचा सातत्याने मानसिक व शारीरिक छळ केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवलं असून आरोपी नवरा व सासरच्या व्यक्तींना अद्याप अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. तिच्या सोबत गेल्या नऊ वर्षांपासून या विवाहित महिलेसोबत अमानुष छळ करण्यात येत आहे.
सोलापुरात अपघात! आजीच्या डोळ्यादेखत ६ वर्षीय नातवाला दुचाकीने उडवलं, जागीच मृत्यू