नसरापूर अत्याचार व हत्या प्रकरण: भीमराव कांबळेच्या पोलीस कोठडीत १२ मे पर्यंत वाढ
आरोपीची पूर्वीची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य आणि सुरक्षेच्या कारणास्तव आरोपीला प्रत्यक्ष न्यायालयात आणण्याऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्यात आली. तपासासाठी आणखी वेळ आवश्यक असल्याचे सांगत पोलिसांनी कोठडी वाढवण्याची मागणी केली होती. आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि तपासातील महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेऊन न्यायालयाने ही मागणी मान्य केली.
Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला अपघात होता होता राहिला! पायलटच्या धाडसामुळे
ही धक्कादायक घटना १ मे २०२६ रोजी घडली होती. आरोपी भीमराव कांबळे याने चार वर्षांच्या मुलीला वासरू दाखवण्याच्या बहाण्याने गोठ्यात नेऊन तित्यावर अत्याचार करून तिची हत्या केली. इतकेच नव्हे तर गुन्हा लपवण्यासाठी आरोपीने मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली पुरल्याचे तपासात समोर आले आहे. या घटनेनंतर परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले.
या प्रकरणाच्या तपासासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. संदीप सिंग गिल यांच्या नेतृत्वाखाली सहा अधिकाऱ्यांचे पथक तपास करत आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी, रासायनिक विश्लेषण तसेच इतर तांत्रिक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. आरोपीविरुद्ध भक्कम आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलीस विविध बाजूंनी तपास करत आहेत.
तपासादरम्यान आरोपीचा पूर्वीचाही गुन्हेगारी इतिहास समोर आला आहे. २०१५ मध्ये त्याच्यावर पॉक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. तसेच १९९८ मध्ये विनयभंगाच्या प्रकरणातही त्याचे नाव समोर आले होते. या सर्व जुन्या प्रकरणांची माहिती पुन्हा तपासली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
‘देवेंद्र फडणवीस नवं पुण्याचे शिल्पकार’ झाल्यापासून पुण्यात दररोज एक बलात्कार;
या घटनेनंतर नसरापूर आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर जनआक्रोश उसळला. आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी नागरिकांनी पुणे-बंगळूरू महामार्ग रोखून आंदोलन करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात करण्याचे आश्वासन दिले आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याबाबतही सरकार स्तरावर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांनीही या प्रकरणाची दखल घेतली असून पीडित कुटुंबाला कायदेशीर आणि आर्थिक मदत देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.






