फोटो - सोशल मीडिया
बुलंदशहर : सध्या देशभरामध्ये ED आणि CBI चे धाडसत्र वाढले आहेत. त्यामुळे विरोधक टीका देखील करत असतात. मात्र उत्तर प्रदेशमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. सीबीआयची धाड पडल्यामुळे एका अधिकाऱ्याने जीवन संपवल्याचा केल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सीबीआयच्या छाप्यानंतर यूपी पोस्ट ऑफिसच्या अधिकाऱ्याने जीवन संपवले आहे. व्हॉट्सॲपवर मेसेज लिहित या व्यक्तीने सहकाऱ्यांवर दबाव असल्याचा आरोप देखील केला आहे.
टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी संदेश
मात्र उत्तर प्रदेशमधील पोस्ट ऑफिसच्या अधिकारी टीपी सिंग यांच्यावर सीबीआयचा छापा पडला. उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये पोस्ट ऑफिसचे अधीक्षक होते. भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणी सीबीआयने त्यांच्या घरावर छापा टाकला. यामध्ये त्यांची कसून चौकशी करण्यात आली. छाप्यानंतर अधिकाऱ्यांने टोकाचे पाऊल उचलले. यापूर्वी टीपी सिंग यांनी व्हॉट्सॲपवर मेसेज देखील केला. यामध्ये त्यांनी धक्कादायक आरोप केले आहेत.यामध्ये त्यांनी जीवन संपवण्याचे कारण सांगितले आहे. टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी त्यांनी ऑफिसमधील सहकाऱ्यांनी छळ केल्याचा आरोप केला आहे.
उत्तर प्रदेशातील बुलंदशहर पोस्ट ऑफिसचे अधीक्षक टीपी सिंग यांची सीबीआय चौकशी झाली. सीबीआयने त्यांची अनेक तास कसून चौकशी केली. त्यानंतर टीपी सिंग हे त्यांच्या मूळ गावी अलीगढमध्ये गेले. त्यांच्या घरी पोहोचल्यावर त्यांनी आपले शेवटचे पत्र अनेक व्हॉट्सॲप ग्रुप्समध्ये पोस्ट केले. त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. कोणी रिप्लाय करेपर्यंत टी पी सिंग यांनी त्यांचे आयुष्य संपवले. त्यांनी व्हॉट्सॲपवर लिहिलेल्या पत्राच्या आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत.
संदेशामध्ये नेमकं काय?
टी पी सिंग यांनी पत्रामध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की, अनेक कार्यालयीन सहकाऱ्यांनी त्याचा छळ केला आणि त्यांच्यावर अनावश्यक दबाव टाकला. अलिगड पोलिस प्रमुखांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात त्यांनी त्यांच्या अनेक सहकाऱ्यांची थेट नावे घेतली. काम करण्यासाठी सतत दबाव येत असल्याचे त्यांनी सांगितले. सिंग यांनी लिहिले आहे की, “काम करण्यासाठी सतत दबाव येत आहे आणि अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यांच्याकडून सतत दबाव आणला जातो, असे पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे. टी पी सिंग यांनी स्वतः हे पत्र व्हॉट्सॲपवर पाठवले आहे.