OLA चे सीईओ भाविश अग्रवालांवर गुन्हा दाखल (फोटो- सोशल मिडिया)
ओला कंपनीत कर्मचाऱ्याने केली आत्महत्या
OLA चे सीईओ भाविश अग्रवालांवर गुन्हा दाखल
28 पानांची सुसाइड नोट आढळली
एक मोठी बातमी समोर येत आहे. ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या कंपनीतील एका इंजिनीअरने आत्महत्या केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंगळुरूमध्ये एका ओला इंजिनीअरने आत्महत्या केल्याची घटना घडली. यामुळे सीईओ अग्रवाल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंजिनीअरने आत्महया केली. त्यानंतर त्याच्या भावाने दिलेल्या तक्रारीनंतर ओलाचे सीईओ भावीश अग्रवाल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर भारतीय दंड संहिता 108 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्मचाऱ्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ज्या कर्मचाऱ्याने आपले जीवन संपवले त्याच्याजवळ 28 पानांची सुसाइड नोट देखील आढळून आली आहे.
काय आहे प्रकरण?
ओला कंपनीतील एका कर्मचाऱ्याने राहत्या घरी विष पिऊन आत्महत्या केली होती. त्यांना उपचारांसाठी रूग्णालयात नेण्यात आले होते. मात्र त्याआधी त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या भावाला 28 पानांची एक सुसाइड नोट आढळून आली आहे. यामध्ये त्यांनी मानसिक छळ ,दबाव आणि पगार याबाबतचे काही आरोप त्यांनी भाविश अग्रवाल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर केले होते.
धक्कादायक ! दुचाकी जाळत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; त्र्यंबकरोडवरील आयटीआय सिग्नलजवळील घटना
दुचाकी जाळत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
त्र्यंबकरोडवरील आयटीआय सिग्नलजवळ शनिवारी दुपारी सुमारे दीडच्या सुमारास एका तरुणाने भररस्त्यात आपल्या दुचाकीला पेटवून आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रयत्न केल्याची घटना घडली. यावेळी दुचाकी पेट घेताच मोठा स्फोट होऊन आगीचा भडका उडाला आणि परिसरात क्षणात गोंधळ निर्माण झाला होता. नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन सिन्हा यांनी धैर्य दाखवत जळत्या दुचाकीजवळून तरुणाला मागे ओढून त्याचा जीव वाचवला. उपस्थित नागरिकांनी त्यांच्या या तत्परतेचे कौतुक केले आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले. अग्निशमन दलाच्या जवानांनी देखील वेळीच हस्तक्षेप करून दुचाकीवरील आग विझवली. दरम्यान, या घटनेमुळे काही वेळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. घटनेचा पुढील तपास सातपूर पोलीस करत आहेत. तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न नेमक्या कोणत्या कारणासाठी केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.