पुण्यात सायबर क्राईममध्ये वाढ (फोटो- istockphoto)
पुणे/ अक्षय फाटक: पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील ६५ हजार नागरिकांना वर्षाच्या आत ११०० कोटींहून अधिक गंडा घालणाऱ्या सायबर चोरट्याचं जाळ अधिक घट्ट होऊ लागलं असून, यंदाचे वर्ष शेअर मार्केट, गुंतवणूकीवरील जादा नफा, वर्क फ्रॉर्म होम, टास्क फ्रॉड या चार प्रकारात सर्वाधिक फसवणूक केल्याचे पोलीस दप्तरी दाखल झालेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. तर वर्षानुवर्षे सुरू असलेला डेबीड कार्ड तसेच सेक्सस्टॉर्शन फसवणूकही सुरूच असून, त्यात देखील तक्ररी वाढत असल्याचे दिसत आहे.
सांस्कृतिक शहरातील स्ट्रीट गुन्हेगारीपेक्षा भयावह परिस्थिती सायबर गुन्ह्यांची झाली आहे. फक्त, सायबर गुन्हेगार वैयक्तिक संदंर्भात असल्याने तिची भिषणता तितकी सध्या तरी दिसत नाही किंवा पाहिली जात नाही. मात्र खऱ्या अर्थाने हे गुन्हेगार थेट आर्थिकनुकसान करत असल्याने पुर्ण आयुष्याची घडी विसकटली जात आहे. त्यासोबतच मानसिक त्रास देखील प्रचंड सहन करावा लागतो. कुटूंबाला ही धग सोसावी लागत असल्याचे काही प्रकरणातून समोर आलेले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, बहुंताश सायबर गुन्हे देशातून घडतात, तर काही परदेशातून. धक्कादायक म्हणजे, काही प्रकरणातील रक्कम ही देशाबाहेर जात असल्याचेही समोर आले आहे. तसेच हैद्राबाद पोलिसांनी एका गुन्ह्याचा तपास करताना त्यातील रक्कम ही जागतिक दहशतवादी संघटनेला गेल्याचे समोर आणले होते. त्यामुळे सायबर गुन्हेगारीकडे रस्त्यावरील गुन्हेगारीपेक्षाही गांर्भियतेने पहावे लागणार आहे. यात पोलिसींग स्मार्ट करावी लागणार तर आहेच, पण नागरिकांनी देखील सतर्कता बाळगावी लागणार आहे. त्यानंतरच हे गुन्हे कमी होऊ शकणार असल्याचे पोलीस सांगतात.
वर्षभरात दोन जिल्हा भरातील ६५ हजार नागरिकांकडून तब्बल ११५० कोटींची रक्कमेची फसवणूक झाली आहे. विशेष म्हणजे, हे पोलिसांपर्यंत आलेल्या तक्रारींचा आकडा आहे. पोलिसांकडे भितीपोटी न आलेल्या नागरिकांची संख्या वेगळीच म्हणता येईल.
यंदा सर्वाधिक सायबर गुन्ह्यांच्या तक्रारींचे प्रकार…
१) शेअर मार्केट, गुंतवणूक, पॉलिसी फ्रॉड
२) ऑनलाईन काम, वर्क फ्रॉर्म होम, टास्क फ्रॉड
३) फिशींग कॉल, लिंकद्वारे फ्रॉड, फेक नावाने कॉल
४) डेबीड, क्रेडिट कार्ड, क्लोन कार्ड व ओटीपी शेअरद्वारे झालेले फ्रॉड
५) इतर सायबर` फ्रॉड
६) सेक्सस्टॉर्शन
शेअर मार्केटच्या फसवणूकीत जवळपास दीडशे कोटींची फसवणूक झाल्याचे सांगण्यात येते. यंदा सर्वाधिक सायबर गुन्हेगारांनी या फ्रॉडद्वारे नागरिकांची फसवणूक केली आहे. त्यानंतर टास्क फ्रॉड तसेच वर्क फ्रॉर्म होम व ऑनलाईन काम देण्याच्या बहाण्याने फसवणूक झाली आहे. तसेच डिजीटल अॅरेस्ट हा नवीनच प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सायबर गुन्हेगारीत पाहिला मिळत आहे.
वर्षभरातील सायबर फ्रॉडमधील रक्कम
पिंपरी-चिंचवड—२७ हजार तक्रारी – ४२९ करोड
पुणे शहर—३८ हजार तक्रारी – ६६९ करोड
पुणे ग्रामीण- फसवणूक रक्कम ६४ कोटी