मृतक महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक
अय्युब सय्यद हे आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग 16 मधून निवडणुकीसाठी इच्छुक होते. व्हिडीओ फोटो त्यांनी स्वतःच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले असून त्याला लाखोंच्या संख्येने व्हिव्ज आहेत.
सीसीटीव्हीमध्ये संशयित कैद
सीसीटीव्हीमध्ये तीन संशयित इसम कैद झाले आहे. शुक्रवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास तीन अनोळखी इसम हे अय्युब सय्यद यांच्या घरात प्रवेश करतांना दिसले. तेच तीन इसम रात्री 2 च्या सुमारास परत जाताना दिसत आहेत. शनिवारी दुपारी ही मृत्यूची घटना उघडकीस आल्याने या अज्ञात तीन इसमानीच अय्युब यांची हत्या केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांना आहे. पोलीस या आरोपीचा शोध घेत आहे. मात्र अय्युब यांची हत्या कश्यासाठी करण्यात आली हे अद्याप समोर आलेले नाही, याचा देखील तपास सोलापूर शहर पोलीस करत आहे.
कॉलेजमध्ये रॅगिंगचा कहर; 11वीच्या विद्यार्थ्याला तीन तास स्टम्पने मारहाण, कॉलेज प्रशासनावर गंभीर आरोप
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील उक्कडगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ११ वी मध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला चार विद्यार्थ्यांनी खोलीत घुसून बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव प्रसिक बनसोड असे आहे. तो मारहाणीत गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही घटना उक्कडगाव येथील एका महाविद्यालयात घडली. या घटनेमुळे महाविद्यालय प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
चार विद्यार्थ्यांनी रूममध्ये जबरदस्तीने प्रवेश करून त्याला स्टम्पने मारहाण केली. तब्बल तीन तास मारहाण करण्यात आली असा गंभीर आरोप पीडित विद्यार्थ्याने केला आहे.
Ans: अय्युब सय्यद, सोलापूर मनपा निवडणुकीसाठी प्रभाग 16 मधून इच्छुक.
Ans: तीन अनोळखी इसम सीसीटीव्हीमध्ये घरात येताना व जाताना कैद झाले आहेत.
Ans: हत्येचं कारण, आरोपींची ओळख आणि राजकीय किंवा वैयक्तिक वादाची शक्यता.






