पालघर मधून अघोरी पूजेची एक धक्कादायक घटना समोर समोर आली आहे. पालघरच्या मनोर पोलीस ठाण्याच्या अंतरंगात असलेल्या सातिवली गावातील स्मशानभूमीत अघोरी पूजा आणि जादू टोण्याचा प्रकार सुरु होता. अचानक अघोरी पूजा करतांना निम्म्या पूजेतून मांत्रिक पळाला. परंतु अर्ध्यातून पळून जाण्याचं नेमकं कारण काय?
चोरटे करोडपती अन् पुणेकर कंगाल; साडेतीन वर्षात तब्बल 73 कोटींचा ऐवज लंपास
तर घडलं असं की मुंबई अहमदाबाद महामार्गालगतच्या सातिवली गावातील पाटील पाड्याच्या स्मशानभूमी परिसरातील ओहोळा लगतच्या खडकावर अघोरी कृत्य आणि पूजा सुरू असल्याचं स्थानिक शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले होते. याबाबतची माहिती शेतकऱ्यांनी ग्रामस्थांना दिल्यानंतर सरपंच, उपसरपंच, तंटा मुक्ती अध्यक्ष, महिला आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पूजास्थळी ग्रामस्थ येत असल्याची कुणकुण लागताच अघोरी पूजा करणाऱ्या आणि पुजाऱ्याने घटनास्थळावरून पळ काढला. ग्रामस्थांनी अघोरी पूजेबाबत जाब विचारला असता पूजेत सहभागी असलेल्याने ग्रामस्थांसोबत हुज्जत घालत अरेरावीची करत घटनास्थळावर निघून गेला.
घटनास्थळी काय मिळालं?
घटनास्थळी अघोरी पूजे आणि जादू टोण्यासाठी पिठाची बाहुली, लिंबू,चाकू, पांढरी टोपी, बिडी – सिगरेट, कोंबड्याची पिसे, अबीर, गुलाल आणि अगरबत्ती आदी साहित्य आढळून आले आहे.
ग्रामस्थांची मागणी काय?
याप्रकरणी ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती देऊन सुद्धा पोलीस घटनास्थळी फिरकले नाही त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.अघोरी पूजा आणि जादू टोण्याच्या प्रकारामुळे गावातील वातावरण बिघडण्याची शक्यता असून पूजा घालणाऱ्या विरोधात पोलिसांना कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. त्यामुळे पोलीस आता नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
भूत काढण्याच्या बहाण्याने अंध तरुणांकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
मुंबईच्या विरार मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीला तिच्या अंगात भूत असल्याचे सांगत तिच्यावर बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापैकी बलात्कार करणारा मुख्य आरोपी हा अंध आहे. तर दुसऱ्या आरोपीने त्याला लॉजवर नेण्यासाठी मदत केल्याचं समोर आलं आहे. या दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Crime News : कोयते लपवण्यासाठी मुलाला आईचीच साथ; पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर