वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण; सासरा, दीराला तीन दिवसांची पोलीस कोठडी
पुणे: वैष्णवी आत्महत्याप्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अटकेत असणाऱ्या सुशील हगवणे व शंशांक हगवणे या भावांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पुणे पोलिसांकडून घेतलेल्या पिस्तूल परवाण्याची चौकशी सुरू करण्यात आली असून, परवाना घेत असताना पुण्यातील रहिवाशी म्हणून पत्ते दिल्याचे समोर आले आहे. त्याबाबत पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. बेकायदा काही समोर आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
बावधन परिसरातील धणीक असणारे राजेंद्र हगवणे यांचे कुटूंब मुळचे भूकुममधील आहे. ते राहण्यास बावधन परिसरत आहेत. कोट्यवधींची माया लग्नात घेऊनही आणखी दोन कोटी आणावे, यासाठी वैष्णवीचा अनन्वित छळकरून आत्महत्येस प्रवृत्त केले. हगवणे कुटूंबावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक झाली. त्यानंतर त्यांची एक-एकप्रकरण समोर येऊ लागली आहेत.
हगवणेचा कायमस्वरुपी निवासाचा पत्ता पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. मात्र, त्यांनी पुण्यात निवास असल्याचे दाखवून पिस्तुल परवाना घेतला. त्यासोबतच नीलेश चव्हाण यानेही पिस्तूल घेतले आहे. तिघांनी पिस्तूल २०२२ मध्ये घेतल्याचे समोर आले आहे. पुणे व बावधन पोलिसांच्या निदर्शनास हा प्रकार आला. तिघांचे पिस्तुल जप्त केले असून, ते परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याप्रकरणाची पुणे पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
दोघांनी पोलिसांची दिशाभूल केल्याचे निष्पन्न झाल्यास दोघांवर याप्रकरणात गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. दोघांनी वारजे आणि कोथरूड पोलीस ठाण्यां
तर्गत परवान्यासाठी अर्ज केला होता. नंतर पडताळणी करून त्यांना परवाना दिला गेला. यासाठी त्यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वास्तव्यास असल्याचा पुरावा म्हणून भाडेकरार दिल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.
मात्र, एकाच घरातील शशांक व सुशील यांना एकाच वेळी सुरक्षेसाठी पिस्तुलाची काय अवश्यकता निर्माण झाली, ते तत्कालीन पौड पोलिसांच्या हद्दीत राहत असूनही पुणे पोलीस आयुक्तालयातून पिस्तुल परवाना कसा घेतला, असे प्रश्न उपस्थित झाले होते.
भाडेकरार करून दोन महिन्यातच अर्ज
हगवणे बंधूंनी पौड पोलिसांकडे पिस्तुल परवान्यासाठी अर्ज केला होता. तत्कालीन पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी त्यांना परवाना नाकारला होता. त्यानंतर त्यांनी पुणे पोलीस आयुक्तालयात अर्ज केला. अर्जासोबत सादर केलेला भाडेकरार केवळ दोन महिने जुना होता, असे पोलिसांना दिसून आले आहे. याप्रकरणी परिमंडळ तीनचे उपायुक्त संभाजी कदम चौकशी करीत आहेत.