सोलपुरात वैष्णवी प्रकरणाची पुनरावृत्ती
चारचाकी कार हवी, खचार्साठी पैसे हवे यासाठी सातत्याने तीचा छळ सुरु झाला. दोन वेळा तर मुलीच्या आई वडिलांना व्हिडीओ कॉल करून देखील पवन याने मारहाण केली. २०२४ साली मारहाण सहन न झाल्याने आशाराणी ही माहेरी रायचूरला निघून आली. तेव्हा पत्नी नांदायाला येतं नाही म्हणत पवन याने पोलिसात तक्रार दिली. महिला तक्रार निवारण केंद्राने दोन्ही कुटुंबियांची समजूत घातली. त्यानंतर आशाराणी हिला पुन्हा नांदवण्यास पाठवण्यात आलं. मात्र वर्षभराच्या आत ही दुदैर्वी घटना घडली. काल आत्महत्या झाल्यापासून मृत अशाराणी हिची तीन वर्षाची मुलगी वैष्णवी ही सासरच्या ताब्यात होती. आता काही वेळा पूर्वी वैष्णवीला आशाराणी यांच्या माहेरच्या कुटुंबियांना देण्यात आलं आहे.
२०२४ मध्ये देखील पती पवन याने आशाराणी भोसले हिला मारहाण करून माहेरी पाठवलं होतं. त्यावेळी महिला तक्रार निवारण केंद्राच्या मदतीने पती पत्नीचे समुपदेशन करण्यात आले होते. मात्र त्यानंतर देखील पती पवन भोसले, सासू अलका भोसले, सासरा बलभीम भोसले यांच्याकडून त्रास देणं सुरूच होते. त्यामुळेच मुलगी आशाराणी भोसले हिने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची फिर्याद आशाराणीचे वडील नागराज डोणे यांनी दिली आहे. त्यांच्या फियार्दीवरून मृत आशाराणीचे पती पवन भोसले, सासू अलका भोसले, सासरा बलभीम भोसले या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.