(फोटो सौजन्य: Ai Created)
Mumbai Crime: गर्लफ्रेंडच्या वाढदिवसासाठी मुलानेच आईचे लाखोंचे दागिने चोरले; मुंबईत खळबळ
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रहीम शेख व्यावसायाने वकील असून २०१८ पासून त्याची आणि पिडित महिलेची ओळख आहे. त्याने आपले नाव ‘रोहन’ सांगत पिडित महिलेसोबत संबंध वाढवले आणि तिचा विश्वास संपादन केला. सुरुवातीला दोघांमध्ये व्यावसायिक संबंध निर्माण झाले, जे कालांतराने वैयक्तिक नात्यात बदलले. इतकंच काय तर एक वकिल कार्यालय ओपन करुन त्यांनी एकत्र काम देखील केले. याकाळात त्याने आपले खरे नाव कधीही सांगितले नाही ज्यामुळे पिडित महिलेला कधीही त्यावर शंका आली नाही.
पूजापाठ करुन जिंकला विश्वास
पिडित महिलेने आरोप केला आहे की, रहिमने हिंदू धर्माच्या अनेक विधींमध्ये रुिची दाखवत तिचा विश्वास जिंकला. तो गणपती आणि सत्यनारायणाच्या पूजेत देखील सामील झाला होता. महिलेने हे देखील सांगितले की, त्याने तिच्या भांगेत कुंकु भरून, गळ्यात मंगळसूत्र देखील घातले होते. या सर्व वागणूकीने तिला विश्वास दिला की, त्यांच नाव लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहे.
आरोपीचं आधीच लग्न झालं होतं
महिलेने आरोप केला आहे की, लग्नाचं आमीष दाखवून आरोपीने अनेकदा तिच्यासोबत शारीरिक संबंध बनवले. पण पिडितेने जेव्हा लग्नाचा दबाव टाकला तेव्हा तो पूर्णपणे बदलला आणि त्याने लग्न करण्यास पूर्णपणे नकार दिला. यानंतर जेव्हा महिलेने त्याच्याविषयी माहिती काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला समजले की, आरोपीचं आधीच एका महिलेसोबत निकाह झाला आहे. त्याचं लग्न तिच्यासाठी एक धक्कादायक बाब होती ज्यानंतर आपल्यासोबत झालेल्या फसवेगिरीची तिला कल्पना आली. तिने जेव्हा त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने तिला मारहाण करत शिवीगाळ देखील केली.
कलिंगड खाल्ल्यानंतर कुटुंबाची प्रकृती बिघडली; चिमुकल्याचा मृत्यू, ५ जणांवर उपचार सुरू
दरम्यान हे प्रकरण उघड झाल्यानंतर आता रहीम रझाक उर्फ रहीम शेख याच्या विरोधात बलात्कार, फसवणूक आणि अनुसूचित जाती/जमाती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, हे प्रकरण लव्ह जिहादचं प्रकरण वाटतं असलं तरी पोलिस याला आरोप मानत तथ्यांच्या आधारे प्रकरणाचा तपास करत आहेत.






