संग्रहित फोटो
पुणे/अक्षय फाटक : दुचाकींच्या शहरातील भयावह चित्र दिवसेंदिवस आणखीनच गडद होत चालले असून, पुणेकर आता पोलिसांना आता तरी वाहन चोरांना “आवरा” अशी आर्त हाक मारू लागले आहेत. दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत असताना त्या उघड करण्यातही पोलिसांना म्हणावे, तसे यश येत नसल्याचे वास्तव आहे. गेल्या सहा महिन्यात तब्बल ९८९ वाहने चोरीस गेली आहेत. त्यातील केवळ २४२ वाहने शोधण्यात यश आले आहे.
पुण्याला सायकलींचे अन् नंतर दुचाकींचे शहर म्हणून ओळखले जाते. पण, दुचाकींच्या शहरात वाहन चोरटे जोमात अन् पोलिस कोमात अशी परिस्थिती गेल्या चार ते पाच वर्षांपासून सलग पाहायला मिळत आहे. चोरटे सुसाट सुटलेले असताना पोलिसांना त्यांना आवर घालण्यात काही केल्या यश येतच नाही. सर्वसामान्यांची जीवन वाहनी म्हणून दुचाकीकडे पाहिले जाते. मात्र, त्यावरच चोरटे डल्ला मारत आहेत. त्यामुळे आर्थिक भुर्दंडासोबतच मनस्ताप सहन करावा लागतो. पोलिसांत गेल्यानंतर तत्काळ तक्रार घेतली जातच नाही. आधी वाहन शोध घ्या, मग एक-दोन दिवसानंतर तक्रार दाखल करा, अशी प्रथम सूचना होते.
अनेकवेळा तक्रारदाराच पोलिसांना सीसीटीव्ही आणून देतात. तरीही पोलिस त्याकडे गांर्भियाने पाहत नसल्याचे वास्तव आहे. सर्वसामान्यांना या सर्वांचा त्रास सोसावा लागतो. सार्वजनिक रस्त्यांसह, खासगी पार्किंग व सोसायटींमधून वाहने चोरीला जातात. वाहन चोरांसोबतच आता वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळक्यांमुळेही वाहन चालक हैरान आहेत. आधीच गाडी लावलेल्या जागेवर सकाळपर्यंत सुरक्षित राहते का, याचा नेम नसताना आता अचानकच टवाळखोर त्यांची तोडफोड करू लागले आहेत. दिवसाला सरासरी पाच ते सहा वाहने चोरीला जात असल्याचे गेल्या काही वर्षांपासून आकडेवारीवरून स्पष्ट दिसत आहे. त्यावरून शहरातील वाहन चोरीच्या घटनांची तीव्रता लक्षात येईल. त्यामुळे पोलिसांपुढे खर्या अर्थाने वाहन चोरांना रोखण्याचे मोठे आव्हान आहे.
घरफोड्या, मोबाईल चोरी, चैन चोरी आणि दुचाकी चोरीची हीच स्थिती आहे. हा आलेख वर्षागणीक वाढत आहे. पोलिसांच्या पुढे चोरटे अन् आपण त्यांच्या मागे, इतकाच तो लंपडाव सुरू आहे. शहर सुरक्षिततेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून एक सीसीटीव्हीचे जाळे निर्माण केले आहे. चोरटे सीसीटीव्हीत कैद होत असले तरी त्यांचा थांगपत्ता लागत नाही.
तीन वर्षांतील वाहन चोरीचा आकडा
वर्ष- दाखल- उघड
२०२२- १,८२५- ७८७
२०२३- १९६२- ५८३
२०२४- १९१३- ४१७
२०२५- ९८९- २४२
वाहन चोरीविरोधी पथक करतात काय
वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासोबतच त्या रोखण्यासाठी गुन्हे शाखेअंतर्गत वाहन चोरीविरोधी पथक आहेत. दोन विभागात दोन स्वतंत्र पथक आहेत. त्याठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे. त्यांना वाहन चोर शोधण्याचा टास्क आहे. पण, त्यांची कामगिरी सुमारच आहे. अनेक वर्षांपासून ही पथके अधून-मधून एखाद दुसरी कारवाई करतात आणि त्यावरच पथकाची टिमटिमी मिरवतात. त्यांची चमकादर कामगिरी मात्र, काही दिसत नाही.
वाहन चोरीचे गांर्भिय नाही
पुणे शहरातून वाहन चोरीच्या घटना सातत्याने घडत असताना स्थानिक पोलिसांना त्याचं गांर्भिय नसत, हे अनेक प्रकरणात समोर आले आहे. वाहन चोरीची तक्रार देण्यास गेल्यानंतर पोलिस तक्रारदारालाच दुश्मन समजून वागणूक देतात, कुठ लावली होती गाडी, कागदपत्रे आहेत का ? कशी गेली, लक्ष ठेवता येत नाही का, दोन ते तीन दिवस आजू-बाजूला शोध घ्या. मिळेल. नाहीच मिळाली तर मग तक्रार दाखल करू अशी उत्तरे मिळतात. त्यावरून पोलिस किती गांर्भियाने अशा घटना घेतात असा प्रश्न आहे.
चोरींचे काही कारणे