गुन्हे दाखल
बालेवाडी परिसरात हा सगळा प्रकार घडला आहे. नवरीच वय अवघे १५ वर्ष होत. तरीही घरच्यांचा आग्रह असल्याने मुलीच लवकर लग्न व्हाव म्हणून त्यांनी मुलीच लग्न लावून दिल आणि १५ ह्या वर्षीच विवाह करण्याचं ठरवलं. मुलगा हा ग्रामीण भागातील आहे. तो शेतात काम करतो मात्र या लग्नाने त्याच्यावर पण आणि त्याच्या घरच्यावर पण गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण ३५ जणांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. बालेवाडी परिसरात हा सगळा विवाह सोहळा सुरू असतानाच पोलिसांना याची खबर लागली होती. मात्र पोलिसांनी तपास करत ३५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिसांना खबर मिळाली आणि…
जेव्हा बालविवाह पार पडला होता. तेव्हा तातडीने पोलिसांना कॉल करून कोणीतरी माहिती दिली. बालवाडी परिसरात बालविवाह पार पडला आहे. जशी तक्रार प्राप्त झाली लगेच पोलीस तातडीने घटनास्थळावर दाखल झाले. आधी त्यांनी खातरजमा केली. नवरा आणि नवरी दोघांचे ही त्यांनी वय तपासल तेव्हा मुलीचे वय अवघ १५ वर्ष आढळून आल आहे. पोलिसांनी आई वडील, मुलाचे आई वडील आणि इतर नातेवाईक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. एवढ्या कमी वयात लग्न लावण्याचं किवा कोणतीही याची कल्पना नसताना बालविवाह का लावला ? याचा तपास आता पोलीस करत आहेत. मात्र पुण्या सारख्या प्रगत शहरात जर अशा घटना घडत असतील तर बालविवाह प्रतिबंधक कायद्याची जनजागृती अजून झाली नाही अस म्हणाव लागले. ३५ जणांवर आता काय कडक कारवाई केली जाते हे आता पाहणं महत्वाचं ठरलं आहे.
Ans: मुलीचे वय १५ वर्ष होते.
Ans: एकूण ३५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ans: हा प्रकार बालेवाडी परिसरात घडला.






