पुणे: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चार आरोपींनी घरात घुसून एका महिलेवर आणि मुलावर तलवारीने वार केले. यात ते गंभीर जखमी झाले. या हल्ल्याचा थरारक व्हिडीओ देखील समोर आला आहे. ही घटना येरवडा परिसरातील लक्ष्मीनगर येथे रविवारी सकाळी घडली. या थरारक घटनेने संपूर्ण भागात खळबळ माजली आहे.
कारागृहातच कैद्याची आत्महत्या; लोखंडी गजाला जोरदार धडक दिली अन् जखमी होताच…
नेमकं काय घडलं?
चार तरुण अचानक त्यांच्या घरात घुसले आणि महिलेस मारहाण केले. त्यानंतर मुलाने माझ्या आईला का मारले? असा प्रश्न विचारले तर आरोपी जाहूर शेखने थेट तलवार हातात घेत महिलेस आणि तिचा मुलगा साजिदवर वार केला. रक्ताच्या थारोळ्यात दोघेही जखमी झाले, तर इतर आरोपींनी घरातील वस्तूंचे नुकसान करत गलिच्छ शिवीगाळ केले. आरोपींचा नाव जहुर शेख (28), सुलतान खान (20), आझाद खान (22) आणि मुस्तफा खान (21) असे आहे. सर्व एकाच परिसरातील रहिवासी आहेत. त्यातून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे तर तीन आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पुण्यातून सतत मारहाण, दहशत माजवणे, चोरी, हाणामारी अशा घटना समोर येत आहेत. दररोज नवे गुन्हे घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यात पोलिस प्रशासन अयशस्वी ठरत आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे आता सामान्य माणूस पुण्यात खरोखर सुरक्षित आहे का, हा चिंतेचा विषय बनला आहे.
पुण्यात गुंडाराज ! पोलिसाला काठीने बेदम मारहाण; मध्यरात्री नेमकं काय घडलं?
पुण्यासारख्या शहरात फिराव की नाही असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे. कारण, अचानक कोण कोठून येईल अन् गाडीची तोडफोड करेल, किंवा किरकोळ कारणावरून मारहाण करेल गाडीची तोडफोड करेल याचा नेमच राहिलेला नाही. हा अनुभव काल पुणे पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याला देखील आला. दुचाकीचा धक्का लागल्यानंतर वादविवाद झाले आणि दोन तरुणांनी पोलीस कर्मचाऱ्याला काठीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री हा प्रकार घडल्यानंतर पोलिस दलात चांगलीच खळबळ उडाली.
लॉ कॉलेज रस्त्यावर ही घटना घडली. मारहाण करणारे पसार झाले असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. अमोल काटकर (वय ३८, रा. बाणेर) असे जखमी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात अज्ञात दोन दुचाकीस्वारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.