सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : पुणे शहरातील वाहतूक सुरळीत करण्याबरोबर त्याला शिस्त लावण्यासाठी आता पुणे पोलीस ‘वाहतूक प्रशिक्षण संस्था’ स्थापन करणार आहे. या माध्यमातून पोलीस कर्मचारी, विद्यार्थी तसेच वाहतूक वॉर्डन यांना प्रशिक्षण दिले जाणार आहेत. त्यासोबत बेशिस्त वाहन चालकांना देखील कारवाईसोबतच शिस्तीचे धडे दिले जाणार असून, पाच दिवस अशा वाहन चालकांना ट्रेनिंग देऊन नंतर त्याचे एक सर्टिफिकेटही दिले जाणार आहे. नंतर त्यांना त्यांचे वाहन परत देण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
शहरातील वाहतूकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. दिवसेंदिवस तो आणखीनच गंभीर बनत चालला आहे. पोलीस वाहतूक सुरळीत करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. परंतु, वाहतूक सुरळीत व कोंडी फुटत नसल्याचे वास्तव आहे. पोलीस कितीही प्रयत्न करत असले तरी बेशिस्त वाहन चालकांची संख्याही कमी होत नसल्याचे दिसत आहे. कारवाई केल्यानंतर देखील हे प्रमाण कमी होत नाही.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडून सातत्याने वाहतूक कोंडीसाठी वेगवेगळे उपाययोजना करण्यावर भर दिला जात आहे. या पार्श्वभूमीवरच आता पुणे पोलिसांकडून वाहतूक प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामाध्यमातून पुण्याची वाहतूक सुरळीत करण्याबरोबरच बेशिस्तांना चाप लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.
हे सुद्धा वाचा : लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणाची आत्महत्या; खून झाल्याचा नातेवाईकांना संशय
असे केले जाणार कामकाज
दीर- भावजयचा मृत्यू
गेल्या काही दिवसाखाली पुण्यातील जेल रोडवरील एका रुग्णालयासमोर गेल्या काही दिवसाखाली भरधाव कारने दिलेल्या धडकेत दीर भावजयीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लोहगाव परिसरातील जेल रस्त्यावरील संजय पार्क येथे हा अपघात गुरूवारी सकाळी झाला. याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशीर्वाद गोवेकर (वय ५२), रेश्मा गोवेकर (वय ४७) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. याप्रकरणी कारचालक अचलकुमार (वय ४३) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत प्रसाद गोवेकर (वय ५४, रा. शिव पार्वती मंगल कार्यालयाजवळ, गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.