नेमकं प्रकरण काय?
हे संतापजनक प्रकरण २०१२ साली कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडले होते. नऊ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बापाने लैंगिक अत्याचार केल्याचा हा अत्यंत भयानक प्रकार घडत होता. ही बाब स्थानिक व्यक्तीच्या लक्षात आली. त्याने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. कोळशेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांना माहिती दिली. ही माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून नराधम बापाला बेड्या ठोकल्या.
Pune Crime : रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल जप्त; सिंहगड रस्ता पोलिसांची मोठी कारवाई
त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात हजर केले. पोलिसांनी सखोल तपास करत अत्यंत सखोल आणि शास्त्रोक्त पद्धतीने पुरावे गोळा केले. या तपासाच्या आधारे पोलिसांनी न्यायालयात सबळ पुरावे सादर केले. अटकेपासून हा आरोपी सातत्याने जेलमध्येच होता. अखेर १४ वर्षानंतर आरोपीला जन्मठेपेची कडक शिक्षा सुनावण्यात आली. पोलिसांचे ठोस पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षी या खटल्यात अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या. या प्रकरणाची अधिकृत माहिती कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगार यांनी दिली.
16 वार करून ‘पेंद्या भाई’ची हत्या; आरोपींची पोलिसांनी भर रस्त्यात काढली धिंड
१६ जुलै रोजी कल्याणच्या आडवली परिसरात मध्यरात्री अर्जुन काळपांडे उर्फ पेंद्या भाई या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. जुन्या वादातून आरोपींनी अर्जुनवर तब्बल १६ वार करण्यात आल. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्या वाचवण्यासाठी धावलेली प्रेयसीवरही हल्लेखोरांनी चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपींच्या शोधला लागले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. पोलिसांनी सापळा रचून अविनाश लल्लन झा, कल्पेश मढवी आणि करण गायकवाड या तिघांना बेड्या ठोकल्या.






