Photo Credit- Social Media
मुंबई: मानकापूर पुलावरून घटनास्थळावरून पळून गेलेल्या संकेत बावनकुळे आणि अन्य दोन जणांवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. देवेंद्र फडणवीस जोपर्यंत गृहमंत्री आहेत तोपर्यंत कोणत्याही प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊ शकत नाही. अशी खरमरीत टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. त्याचवेळी बावनकुळेंच्या मुलाला वाचवण्यासाठी पुरावे नष्ट केले गेल्याचा आरोपही संजय राऊतांनी केला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या ऑडी कारने नागपूरच्या रामदासपेठ परिसरात अनेक वाहनांना धडक दिली पघातावेळी बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे, आणि त्यांचे दोन-तीन मित्रही गाडीत होते. या अपघातात दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यातही घेतले.
हेही वाचा: इंडोनेशियात पर्यटनात अति वाढिची चिंता; बालीमध्ये हॉटेल्स, क्लब बांधणीवर बंदी
या प्रकरणावरून संजय राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस राज्याच्या गृहखात्याचे नेतृत्व करण्यास योग्य नाहीत आणि जोपर्यंत ते या पदावर आहेत तोपर्यंत ते सक्षम होणार नाहीत. कोणत्याही प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊ शकत नाही.आमच्या माहितीनुसार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाने नागपुरात दारूच्या नशेत दोन जणांना गंभीर जखमी केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याचे नाव एफआयआरमध्ये नाही आणि अपघातानंतर कारची नंबर प्लेट काढून टाकण्यात आली.
देवेंद्र फडणवीस गृहखात्याचे नेतृत्व प्रभावीपणे करू शकले नाहीत तर ते या पदासाठी पात्र नाहीत, “कार संकेत बावनकुळे यांच्या नावावर नोंदणीकृत असून सर्व पुरावे नष्ट करण्यात आले,” असा दावा राऊत यांनी केला.जोपर्यंत फडणवीस गृहमंत्री आहेत आणि रश्मी शुक्ला पोलिस महासंचालक आहेत, तोपर्यंत राज्यात कोणत्याही प्रकरणाचा निष्पक्ष तपास होणार नाही, अशी टीकाही संजय राऊतांनी यावेळी केली.
हेही वाचा: दोन लाखांची सुपारी अन् सासूचा विषयच संपवला; भावांसोबत मिळून सूनेने काटा
राऊत म्हणाले, “ऑडी कारने मानकापूर भागात जाणाऱ्या इतर काही वाहनांना धडक दिली. तेथे टी-पॉइंटवर वाहनाने पोलो कारला धडक दिली. ऑडी कारचा पाठलाग करून ती मानकापूर पुलाजवळ अडवली. तर या घटनेनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी कबूल केले की, “ऑडी कार मुलगा संकेतच्या नावावर नोंदणीकृत आहे. पोलिसांनी कोणताही पक्षपातीपणा न करता अपघाताचा सखोल आणि निष्पक्ष तपास करावा. जे दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. मी कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याशी बोललो नाही. कायदा सर्वांसाठी समान असावा.”