संग्रहित फोटो
१ ते ३ डिसेंबर २०२५ दरम्यान निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. संभाव्य गोंधळ, दबाव तंत्रे किंवा बेकायदेशीर कृत्ये रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
बी.एन.एस.एस. कलम १६३(२) नुसार जारी आदेशानुसार, हद्दपारीचा कालावधी १ डिसेंबर रोजी ००.०१ ते ३ डिसेंबर रोजी २४.०० वाजेपर्यंत लागू राहणार आहे. मात्र, लोकशाही हक्क अबाधित ठेवत २ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते ९.३० या दोन तासांत संबंधितांना मतदानासाठी विशेष सूट देण्यात आली आहे. निवडणूक काळात शहरात शांतता व सुरक्षितता राखण्यासाठीचा हा निर्णय घेण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक कार्यालय, सातारा यांच्या मान्यतेने करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
५१ गुन्हेगारांची यादी पुढीलप्रमाणे






