Satara Crime: सातारा शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. गरोदर महिलेने आपल्या दोन चिमुकल्या मुलींसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. यात महिलेचा आणि एका चिमुकलीचा मुत्यू झाला आहे. तर एकीला वाचाव्यात स्थानिकांना यश आले आहे. साताऱ्यातील परळी खोऱ्यातल्या कारी येथे हि घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार,साताऱ्याच्या परळी खोऱ्यातील कारी येथील एका गरोदर मातेने तिच्या दोन मुलींसह घराशेजारीत विहिरीत उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये तिच्या मोठ्या मुलीला वाचवण्यात यश आले आहे. मात्र तिच्या पोटातील अर्भकारसहित गरोदर माता आणि तिची छोटी मुलगी मृत्यूमुखी पडली. ऋतुजा विशाल मोरे (वय 27 वर्ष), स्पृहा विशाल मोरे वय 3 वर्ष, मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर त्रिशा विशाल मोरे वय 6 वर्ष हिला वाचवण्यात यश आले आहे. हे सर्व राहणार कारीचे आहेत. मात्र उद्योगधंद्यानिमित्त ते मुंबई येथे असतात. ते गणपती सणानिमित्त आपल्या मूळ गावी कारी येथे आले होते. याच मूळ गावी हि घटना घडली आहे.
कसे वाचले मुलीचे प्राण?
गणपती उत्सव संपल्यानंतर पुन्हा ते मुंबईला जाणार होते. मात्र कौटुंबिक झालेल्या वादातून ऋतुजा यांनी राहत्या घरापासून काही अंतरावर असणाऱ्या विहिरीकमध्ये मुलगी स्पृहा, त्रिषा यांना घेऊन गेल्या आणि त्यांनी विहिरीमध्ये उडी मारली. यावेळी विहिरी लगतच काही अंतरावर गावातील युवक हराळी ( द्रुवा) काढत होते. यावेळी त्यांना विहिरीलगत लहान मुलीचा ओरडण्याचा आवाज आला. हा आवाज ऐकून ते तात्काळ आवाजाच्या दिशेने विहिरीकडे पळाले. त्यांच्या निदर्शनास आले की मुलगी विहिरीत पडली आहे. विहिरीमध्ये एका झाडाच्या फांदीला धरून एक मुलगी लटकलेली होती ती मोठ मोठ्याने ओरडत होती. त्यांनी तिला तात्काळ वाचवले. मात्र त्याच वेळी विहिरीमध्ये ऋतुजा यांची कन्या स्पृहा याही आढळल्या. त्यांनी तात्काळ गावातील युवकांच्या मदतीने त्यांनी दोन्ही मृतदेह बाहेर काढले. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे. मात्र या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.