शिक्रापूर पोलिसांची मोठी कारवाई
शिक्रापूर : शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक महाविद्यालय परिसरात अल्पवयीन मुले दुचाक्या घेऊन स्टंट करणे, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे असे प्रकार होत असल्याचे समोर आले. त्यावर शिक्रापूर पोलिसांनी सदर महाविद्यालय परिसरात दुचाक्या घेऊन येणाऱ्या पालकांना दणका देत पंचवीस वाहन चालकांकडून पन्नास हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस हवालदार किशोर तेलंग, अमोल चव्हाण, विकास सरोदे, अमोल दांडगे, विकास पाटील, हनुमंत गिरमकर, महिला पोलीस हवलदार उज्वला गायकवाड, किरण निकम यांनी साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालय तळेगाव ढमढेरे समोर कारवाई मोहीम राबवत अल्पवयीन दुचाकी चालकांच्या दुचाक्या ताब्यात घेतल्या. तसेच तब्बल पंचवीस दुचाक्या ताब्यात घेऊन पंचवीस वाहन चालकांकडून रोख स्वरुपात पन्नास हजार रुपये दंड वसूल करुन पंधरा हजार रुपयांचा दंड वाहनांवर ऑनलाईन पद्धतीने दंड लावण्यात आला आहे.
तर या कारवाई मुळे रोडरोमिओ वाहन चालकांनी चांगलाच धसका घेतला असून काही पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर यावेळी बोलताना लवकरच पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कर्कश आवाजांच्या बुलेट वाहनांवर कारवाई मोहीम राबवून कर्कश आवाजांची बुलेट वाहने जप्त करणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे यांनी सांगितले. शिक्रापूर पोलिसांनी केलेल्या कारवाई बाबत काही पालकांनी आमची मुले वाड्या वस्त्यांवरुन शाळेसाठी येत असतात आमच्या येथे एस टी अथवा वाहनांची सोय नाही त्यामुळे मुले मोटार सायकलहून येतात मात्र पोलिसांनी कारवाई केल्यास मुलांना शाळेत पाठवायचे कसे असा सवाल देखील काही पालकांनी उपस्थित केला आहे.
सणसवाडीत दोन मटका अड्ड्यांवर छापा
सणसवाडीत दोन ठिकाणी सुरु असलेल्या मटका अड्ड्यांवर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापे टाकत कारवाई केली आहे. याप्रकरणी दिपक विजय मोरे (वय ३१), आतिष सुखदेव दरेकर (वय ३०), विकी बाळासाहेब हरगुडे (वय २९), प्रवीण बबनराव दरेकर (वय ३३) व सलीम हसन शेख (वय ४९ सर्व रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार दामोदर तुळशीराम होळकर (वय ४१ रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
Crime News : सणसवाडीत दोन मटका अड्ड्यांवर छापा; शिक्रापूर पोलीसांची मोठी कारवाई
सणसवाडी (ता. शिरुर) येथील जय अंबिका कला केंद्रच्या भिंतीच्या बाजूला काही जण नागरिकांकडून पैसे घेऊन मटका खेळवत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना मिळाली. त्यांनतर पोलीस उपनिरीक्षक विजय मस्कर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वेरणनाथ मुत्तनवार, पोलीस हवालदार रविकिरण जाधव यांनी हॉटेल जय अंबिका कला केंद्रच्या भिंतीच्या बाजूला जाऊन छापा टाकला. यात काही जण नागरिकांकडून पैसे घेऊन त्यांना कागदावर आकडे लिहून देऊन मटका खेळवत असल्याचे दिसून आले. दरम्यान पोलिसांनी दोन्ही ठिकाणच्या मटका खेळवणाऱ्या लोकांना ताब्यात घेत त्यांच्या जवळील जुगाराचे साहित्य व रक्कम असा अकरा हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. पुढील तपास पोलीस हवालदार रविकिरण जाधव हे करत आहे.