कशी करण्यात आली मारहाण?
चार विद्यार्थ्यांनी रूममध्ये जबरदस्तीने प्रवेश करून त्याला स्टम्पने मारहाण केली. तब्बल तीन तास मारहाण करण्यात आली असा गंभीर आरोप पीडित विद्यार्थ्याने केला आहे.
पोलीस आयुक्तांच्या नावाचा गैरवापर, सहायक फौजदारावर निलंबनाची कारवाई; नेमकं प्रकरण काय?
का करण्यात आली मारहाण?
रूम स्वच्छ करणे, झाडू मारायला लावल्यावर कामे करण्यास नकार दिल्याने मारहाण केली असल्याचा पीडित मुलाचा आरोप आहे. इतकेच नव्हे तर, “महाविद्यालय प्रशासन दोषी विद्यार्थ्यांना पाठीशी घालत आहे,” असा गंभीर आरोपही त्याने केला आहे. या आधीही महाविद्यालयात असे प्रकार घडले असल्याचा दावा पीडित विद्यार्थ्याने केला आहे.
काठोर कारवाईची मागणी
या संतापजनक आणि धक्कादायक प्रकरणामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पालक वर्गातूनही संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर संबंधित विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच महाविद्यालय प्रशासनाच्या भूमिकेची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
आईच्या प्रियकराने तीन वर्षांच्या चिमुकल्याचा गळा दाबून केली निर्घृण हत्या
सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. आईच्याच प्रियकराने तीन वर्षाच्या चिमुकल्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. प्रियकराने गळा दाबून हत्या केल्याने हा धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. मृत चिमुकल्याचे नाव फरहान जाफर शेख (वय ३) असे आहे. तर आरोपीचे नाव मौलाली उर्फ अकबर अब्दुल रज्जाक मुल्ला असे आहे. त्याला सोलापूरच्या एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.
Ans: चार विद्यार्थ्यांनी खोलीत घुसून स्टम्पने तब्बल तीन तास मारहाण केल्याचा आरोप आहे.
Ans: रूम स्वच्छ करणे व झाडू मारण्यास नकार दिल्याने मारहाण केल्याचे पीडिताचे म्हणणे आहे.
Ans: विद्यार्थी गंभीर जखमी असून धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.






