न्यायालयीन युक्तिवाद
पूजा गायकवाडच्या जामीन अर्जावर सुनावणीदरम्यान तिचे वकील अॅड. धनंजय माने यांनी न्यायालयासमोर महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यांनी सांगितले की, पूजाला फक्त संशयाच्या आधारे या प्रकरणात गुंतवण्यात आले आहे. आत्महत्येपूर्वी गोविंद बर्गे यांनी कोणतीही सुसाईड नोट लिहिलेली नाही. तसेच पोलिस तपास जवळपास पूर्ण झाला आहे. त्यामुळे आरोपी महिलेला कारागृहात ठेवण्यात काहीही तथ्य किंवा लाभ नाही, असे त्यांनी न्यायालयाला पटवून दिले. हा युक्तिवाद मान्य करत न्यायालयाने पूजा गायकवाडला जामीन मंजूर केला.
Kolhapur Crime: कोल्हापूर हादरलं! निवडणूक खर्चासाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा, विवाहितेचा गळफास
नेमकं नातं आणि कारण काय?
गोविंद बर्गे यांना तमाशा कला पाहण्याची आवड होती. ते विविध कला केंद्रांना भेट देत असत. सुमारे दीड वर्षांपूर्वी त्यांची भेट थापडीतांडा येथील कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाडशी झाली. या ओळखीचे पुढे प्रेमसंबंधात रूपांतर झाले. गोविंद नियमितपणे पूजाला भेटण्यासाठी पारगाव केंद्रावर जात होते. या नात्यातून पूजा गायकवाडने त्यांच्याकडून पावणेदोन लाखांचा मोबाईल, सोन्याचे दागिने तसेच तिच्या नातेवाईकांच्या नावावर काही जमीन करून घेतली होती.
मात्र, काही महिन्यांपासून दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले. पूजा गायकवाडने गोविंद यांच्याशी बोलणे बंद केले. इतकेच नाही, तर तिने गोविंद यांच्यावर घर आणि शेती आपल्या नावे करण्याचा दबाव टाकल्याचे समोर आले. मागण्या मान्य न केल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोपही फिर्यादींकडून करण्यात आला आहे. या सर्वामुळे मानसिक तणावात आलेल्या गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.
९ सप्टेंबरच्या रात्री ते पूजाच्या घराबाहेर आले. त्यानंतर त्यांनी कार आतून लॉक करून स्वतःवर गोळी झाडली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मृतदेह कारमध्ये आढळला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
पतीकडून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न, तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार; कारणही आलं समोर
Ans: बीड
Ans: बार्शी
Ans: गोळी






