सांगलीच्या तासगाव तालुक्यातील पाचवा मैलजवळील राष्ट्रीय महामार्गावर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव शिवाजी बापू सुतार, आशाताई शिवाजी पवार, आणि वैष्णव ईश्वर सुतार अशी आहे. तर स्वाती अमित कोळी, पूजा राघवेंद्र कुलकर्णी, सुरज बलराम पवार आणि किशोर लक्ष्मण माळी अशी जखमींची नावे आहेत.
Gondia Crime: गोंदिया हादरलं! मजुरीचे पैसे मागितले म्हणून ठेकेदारानेच केली मजुराची निर्घृणपणे हत्या
एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, मयत शिवाजी सुतार हे आपली पत्नी आशाताई व नातू वैष्णव यांच्यासह मिरज तालुक्यातील काकडवाडी येथे नातेवाईकांना भेटून त्यांच्या बुर्ली या गावी पुन्हा निघाले होते. ते राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना त्यांना कारने समोरून ठोकरले. यामध्ये दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर कार रस्त्याकडेला पलटी झाल्याने कारमधील चौघे जखमी झाले. एकाच कुटुंबातील तिघांचा या अपघातात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी गेले होते
व्हॅगनार कार रस्त्याकडेला पलटी झाल्याने चार जण जखमी झाले आहे. व्हॅगनार मोटारमधील सांगली येथील एका शिक्षण संस्थेतील चौघे शिक्षक कडेपूर येथील आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यास गेले होते.स्वाती अमित कोळी (रा. सांगलीवाडी) यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्वाती कोळी यांच्यासह अन्य तीन शिक्षक कडेपुर येथे गेले होते. तेथील कार्यक्रम आटोपल्यानंतर कडेपूर येथून पाचवा मैल- तासगाव मार्गे पुढे सांगलीला जाण्यासाठी निघाले होते. तासगावच्या नजीक आल्यानंतर समोरुन येणारी दुचाकी व त्यांच्या कारची समोरासमोर धडक झाली.
ही धडक इतकी भीषण होती की, धडकेनंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या उजव्या बाजूला खाली एका द्राक्ष बागेत जाऊन पडली.व्हॅगनार मधील पूजा राघवेंद्र कुलकर्णी, सूरज पवार, स्वाती अमित कोळी(रा.सांगलीवाडी) व अन्य एकजण गंभीर जखमी झाले. या अपघातातील जखमींना तासगाव व सांगली येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मात्र या अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत चाकू हल्ला
तर सांगली जिल्ह्यातून अजून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. सांगलीच्या मिरज येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. भांडण सोडविण्यास गेलेल्या तरुणाला चाकू भोसकल्याची घटना समोर आली आहे. हल्ला झालेल्या तरुणाचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शीतल धनपाल पाटील (वय 25) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिरज तालुक्यातील अंकली येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी, पोलिसांकडून (Police) आता गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे.