पेणमध्ये चोरीचा सुळसुळाट; पोलीसांकडून अट्टल घरफोडी करणाऱ्या चोरास अटक
पेण/ विजय मोकल :- पेण पोलीस ठाणे हद्दीत काश्मिरे गावात वारंवार घरफोडी चोरीचे गुन्हे घडत असल्याने नागरिकांमध्ये भितीचं वातावरण पाहायला मिळालं. दरम्यान या वाढत जाणाऱ्या घरफोडीच्या प्रकारावर पेण पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधिक्षक अभिजीत शिवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदिप बागुल यांच्या सूचने नुसार गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे अधिकारी पोलीस सहाय्यक निरीक्षक समद बेग तसेच पोलीस पथकाकडून सखोल तपास करण्यात येऊन अट्टल घरफोडी करणाऱ्या चोरास अटक करण्यात यश आले आहे. आरोपी हरिश्चंद्र उर्फ गुड्डू बाळकृष्ण म्हात्रे गजाआड करण्यात आले आहे.
काश्मीरे – कांदळेपाडा येथील फिर्यादी सौ. संगिता खंडू पाटील वय 44 वर्षे या शेतावर गेल्या असताना अज्ञात चोराने बाथरूमची खिडकी फोडून घरात शिरला. या चोरट्याने 3लाख74हजार 300 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेत पसार झाला होता. पोलीस ठाण्यात संबंधित गुन्ह्याची तक्रार दाखल केल्यानंतर चोराच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं झाले आहे. आरोपीला पेण येथील न्यायालयात हजर करण्यात आले आहे. हरिश्चंद्र उर्फ गुड्डू बाळकृष्ण म्हात्रे असे आरोपीचे नाव असून पोलीसांनी आरोपीकडून 45हजार रूपये किमतीची १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जप्त केलूी आहे. संबंधित प्रकरणाच्या तपासाबाबत या अट्टल चोराने अधिक गुन्हे केले असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणावर सखोल तपास सुरु असून आरोपीचे इतर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत, असं पेण पोलीस यंत्रणेचं म्हणणं आहे.
सदरची कामगीरी वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे अधिकारी समद बेग, सहा. फौजदर राजेश पाटील, संतोष जाधव, राजेंद्र भोनकर, प्रकाश कोकरे, सुशांत भोईर,अजिंक्य म्हात्रे, सचिन व्हरकोटी, अमोल म्हात्रे, गोविद तलवारे यांनी केलेला असुन सदर गुन्हयाचा प्राथमीक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजपुत तसेच प्रतीक पोकळे यांच्या कडून करण्यात आला असून अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.