पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या संशयावरून सुनीता जामगाडे या महिलेला अटक करण्यात आली आहे. तिची कसून चौकशी करण्यात येत आहे. सुनीता ही सीमा ओलांडून पाकिस्तानात गेली होती अशी माहिती समोर आली आहे. तसेच ती पाकिस्तानातील काही लोकांच्या संपर्कात होती. आता चौकशीतून सुनीताच्या मोबाईलमध्ये काही सस्पेक्टेड ॲप आढळले आहेत. त्यामुळे आता सुनीतावरील संशय आणखी वाढला आहे. त्यामुळे पोलिसांनी मोठी भिती वव्यक्त केली आहे.याबाबत पोलिसांनी महत्वाची माहिती दिली आहे.
ISI चा ‘हनी ट्रॅप’ कट महाराष्ट्रात उघड; ठाण्याच्या रवी वर्माला कसं अडकवलं?
सुनीता जामगाडेच्या चौकशीबाबत माहिती देतांना झोन 5 चे पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी सांगितले की, ‘सुनीता जामगडे आमच्या ताब्यात आहे.दोन मे पर्यंत तिला पोलीस कस्टडी होती आता ती न्यायालयीन कस्टडीत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुनीता पाकिस्तानातील तीन नागरिकांच्या संपर्कात होती. आता तिच्या सर्व सोशल मीडिया अकाउंटची सखोल तपासणी केली जात आहे.’
पुढे सांगितले की, आतापर्यंतच्या तपासात सुनीताने सोशल मीडियावर पाकिस्तानी नागरिकांशी चॅटिंग केल्याचं स्पष्ट झालं आहे. या चॅटिंगची सुरुवात व्यवसाय करण्याबाबत झाली होती, मात्र नंतरच्या काळात चॅटिंगचा प्रकार बदलला, याची चौकशी सुरु आहे सुनीताच्या चौकशीतून काही जागांची नावे आम्हाला कळली आहेत, तसेच तिने कुठल्या जागेवरून बॉर्डर क्रॉस केली ते ठिकाण देखील समजलेलं आहे. सुनीता जामगडेने कश्मीरवरून कारगिलला पोहोचण्यासाठी दोन स्थानिक नागरिकांची मदत घेतली होती त्यांची नावेही समोर आली आहेत. त्यांनाही लवकरच चौकशीसाठी ताब्यात घेतले जाणार आहे.
सुनीताच्या मोबाईलमध्ये सस्पेक्टेड ॲप
ज्यावेळी सुनीता जामगडे पाकिस्तानमध्ये गेली होती त्याचवेळी भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचा वातावरण होत. त्यावेळी ती नऊ दिवस पाकिस्तानमध्ये पाकिस्तानी एजन्सीच्या ताब्यात होती. तिच्या मोबाईलमध्ये काही सस्पेक्टड ॲप सापडले आहेत पण हे ॲप पाकिस्तानी एजन्सीने इन्स्टॉल केले आहेत की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे. सुनीताच्या मोबाईलमधील ॲप ट्युबियस नावाने आहेत, या ॲप द्वारे सुनीताने गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरविल्याचा संशय पोलिसांना आहे. हे कश्यासाठी वापरले जातात हे आताच सांगता येणार नाही आहे.
३७ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार, फोटो-व्हिडीओ काढले आणि….; पुण्यात चाललंय तरी काय?